Home बुलढाणा नऊ संघटना एकत्र आल्या पण एकही उमेदवार निवडून आणू नाही शकलया महाराष्ट्र...

नऊ संघटना एकत्र आल्या पण एकही उमेदवार निवडून आणू नाही शकलया महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या अधिपत्याखाली सहकार पॅनल चा दणदणीत विजय.

32
0

आशाताई बच्छाव

1000537886.jpg

नऊ संघटना एकत्र आल्या पण एकही उमेदवार निवडून आणू नाही शकलया महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या अधिपत्याखाली सहकार पॅनल चा दणदणीत विजय.
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
चिखली :– बुलढाणा वीज कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या बुलढाणा जिल्हा र. नं.211 च्या सण 2024-2029 च्या पंचवार्षिक निवडणुकीत एम एस ई वर्कर्स फेडरेशन च्या सर्व 11 संचालकांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यानिमित्ताने चिखली रोडवरील शाहू बँकेच्या समोर असलेल्या कार्यालयासमोर मोठी गर्दी होती आणि कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष होता.वर्कर्स फेडरेशनच्या अधिपत्यातील बुलढाणा सहकारी पतसंस्था ची दिनांक 7 जुलै रोजी सण 2024 ते 2029 पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली त्या निवडणुकीत वर्कर्स फेडरेशन पुरस्कृत सहकार पॅनलच्या विरुद्ध 9 संघटनांनी एकत्रितपणे विरोधात एकत्र पॅनल टाकले होते वर्कस फेडरेशनच्या पतसंस्था चा कारभार स्वच्छ व पारदर्शक, सभासद हित जोपासणारे असल्यावर ही वर्कस फेडरेशनचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न विरोधी पॅनलने केला 9 संघटनेचे पदाधिकारी एकत्र येऊन अप्रचार केला तरी सुज्ञ सभासद यांनी त्यांची काय जागा आहेहे निवडणुकीतून त्यांच्या 11 उमेदवारांचा पराभव करून व वर्कर्स फेडरेशनचे 11 उमेदवार विजयी करून दाखवून दिली. त्यात सर्वसाधारण मतदारसंघात श्री अनिल चव्हाण, श्री रमेश तांबे ,श्री संतोष दंदाले, श्री श्याम भोजने, श्री विजय लोंढे ,श्री पंजाबराव शेळके ,हे सर्व विजय झाले तसेच इतर मागास प्रवर्ग मधून श्री विजय चवरे हे विजय झाले. अ.ज.क./वि.मा. प्रवर्गातील श्री गजानन जायभाये हे निवडून आले. अनुसूचित जाती /जमाती मधून श्री संदीप गव्हांदे हे निवडून आले. महिला राखीव प्रवर्गातील सौ अर्चना काटे व सौ हर्षा चिडे या निवडून आल्यात.

सभासदांनी एम एस ई वर्कर्स फेडरेशन व कॉ. सी एन देशमुख (कार्याध्यक्ष एम एस ई वर्कस फेडरेशन) यांच्यावर व वर्कर्स फेडरेशनच्या केंद्रीय नेतृत्वावर विश्वास दाखवत एम एस ई वर्कर्स फेडरेशनच्या सर्व 11 संचालक मंडळास निवडून देत प्रचंड मतांनी विजयी केले या निवडणुकीत कॉ. शैलेश तायडे संयुक्त सचिव, कॉ. एन वाय देशमुख (सरचिटणीस कंत्राटी कामगार) कॉ. जी जे देशमुख कें. का. सदस्य, कॉ. विलास गवई के. का. सदस्य व वर्कस फेडरेशनचे सर्व पदाधिकारी ,सदस्य, कार्यकर्ते यांनी एकत्रित प्रचाराचे कामे करून दणदणीत विजय मिळवला व वर्कर्स फेडरेशनचा बुलढाणा हा बालेकिल्ला अभेद्य ठेवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here