आशाताई बच्छाव
शनिशिंगणापुरात भाविकांची मांदियाळी लटकूंची अरेरावी; पोलिस यंत्रणा बघ्याच्या भूमिकेत
सोनई, कारभारी गव्हाणे -शनिशिंगणापूर येथे
दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. विदर्भ व मराठवाड्यातून पंढरपूरला जाणाऱ्या काही पायी दिंड्यांनी महामार्गाहून चार किलोमीटर आतमध्ये येत दर्शनाचा लाभ घेतला. गर्दीचा फायदा घेण्यासाठी रस्त्यावर व गावात लटकूंनी मोठ्या प्रमाणात वाहने अडवून पूजा साहित्य खरेदीकरिता सक्ती केल्याचा प्रकार घडत आहे.
शनिवारी पहाटे साडेचार वाजता आरती सोहळा झाल्यानंतर दर्शनासाठी सुरू झालेली गर्दी दिवसभर टिकून होती. दुपारी बारा वाजता मध्यान आरतीला चौथरा परिसरात हजारो भाविक उपस्थित होते.
येथील चौथऱ्याचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने सर्वांना चौथऱ्याच्या खालूनच दर्शन असल्याने दर्शन व्यवस्था सुरळीत पार पडत होती. शनिवारी सकाळी शनैश्वर पालखी व पायी दिंडीचे पंढरपूरला प्रस्थान झाले.
या निमित्ताने इतर राज्यातील भाविकांना शनिदर्शन व पालखीतील
शनिशिंगणापूर
पादुका दर्शनाचा एकत्र लाभ मिळाला. सायंकाळी येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या पानसतीर्थ घाट परिसरात नवग्रह मंदिर, दीपस्तंभ पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वाहनतळात झालेली वाहनांची गर्दी.
सक्ती अन् अडवणूक
सकाळी अकरानंतर गर्दीचा ओघ वाढताच रस्त्यावर व गावातील जिल्हा परिषद शाळा, पोलिस ठाणे, शाखा परिसर, पानसतीर्थ पुलाजवळ व शिवाजंली चौकात लटकू व पूजा साहित्य विक्रेत्यांकडून वाहनांची अडवणूक व भक्तांना सक्तीने पूजा साहित्य देण्याचे प्रकार झाले.
रस्त्यावर आडवे उभे राहून अडवणूक सुरू असताना पोलिस अधिकारी अथवा वाहतूक पोलिस कुठेच चमकले नाही.