Home भंडारा तनुजा नागदेवे कलाक्षेत्र 2024 पुरस्काराने सन्मानित

तनुजा नागदेवे कलाक्षेत्र 2024 पुरस्काराने सन्मानित

29
0

आशाताई बच्छाव

1000524068.jpg

तनुजा नागदेवे कलाक्षेत्र 2024 पुरस्काराने सन्मानित

 

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)साकोली येथील रहिवासी तनुजा अमित नागदेवे या 10 वर्षापासून फुले शाहू आंबेडकर विचारधारा आपल्या तनुजा भिमगीत गायन मंडळ व कव्वाली च्या माध्यमातून भंडारा व गोंदिया जिल्ह्यात त्यांच्या प्रबोधन सुरू आहे व भविष्यात फुले शाहू आंबेडकर विचारधराच्या प्रचार व प्रसार पूर्ण विदर्भात करणार आहेत
या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई शाखा भंडार-गोंदिया तर्फे गोंदिया येथील उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांच्या दालनात त्यांना शाल , स्मृतीचिन्ह , प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर टेंभरे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी जी रंगारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले त्यांच्या या पुरस्काराबद्दल भंडारा वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले, गोंदिया जिल्हाध्यक्ष बनसोड, विनोद मेश्रम, गोंदिया महिला जिल्हाध्यक्ष किरण फुले, लाखनी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष श्रीकांत नागदेवे,
यादोराव गणवीर, जगदीश रंगारी,अमित नागदेवे, त्रिवेणी मेश्राम ,रेखा रामटेके प्रशिक मोटघरे , गणेश गजभिये व इतर कार्यकर्त्यांनी चा त्यांनी त्यांचे अभिनंदन केले

Previous articleआर्मी सैनिक, साकोली तहसिलचे सुपुत्र नितीन खेडीकर यांना शासकीय इतमातात सलामी
Next articleआचार्य विराग सागर महाराज यांचे समाधी समतापूर्वक मरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here