Home उतर महाराष्ट्र कांगोणी फाट्यावर ग्रामस्थांचा रास्तारोको ब-हाणपूर येथील कुक्कुटपालन उद्योगावर कारवाईची मागणी

कांगोणी फाट्यावर ग्रामस्थांचा रास्तारोको ब-हाणपूर येथील कुक्कुटपालन उद्योगावर कारवाईची मागणी

32
0

आशाताई बच्छाव

1000497130.jpg

कांगोणी फाट्यावर ग्रामस्थांचा रास्तारोको ब-हाणपूर येथील कुक्कुटपालन उद्योगावर कारवाईची मागणी
सोनई, कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी -ब-हाणपूर (ता. नेवासे) गावात सुरू असलेल्या कुक्कुटपालन उद्योगांकडून होत असलेले प्रदूषण व आरोग्याचा प्रश्न वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर गावाला उपद्रव ठरत असलेला उद्योगावर प्रशासनाने कारवाई करावी, याकरिता छावा संघटनेचे सदस्य व ग्रामस्थांनी नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील कांगोणीफाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनाने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दोडशेहून अधिक ग्रामस्थांनी रस्त्यावर ठाण मांडून कुक्कुटपालन उद्योगाच्या विरोधात घोषणा दिल्या. छावा संघटनेचे प्रदेश संघटक अशोक चव्हाण यांनी आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली. उद्योगांकडून कुठलीही खबरदारी घेतली जात नसल्याने गावात दुर्गंधी व रोगराई वाढली आहे. याबाबत संबंधितांकडे तक्रार करूनही उपयोग झाला नसल्याने रास्तारोको आंदोलन करावे लागले, असे यावेळी सांगण्यात आले.
येथील कुक्कुटपालन उद्योग पर्यावरणाचे कुठलेच नियम पाळत नसल्याने तेथे मृत झालेल्या कोंबड्यांची दुर्गंधी व त्यावर झालेल्या माशा परिसरात
पांगत आहेत. जवळ असलेल्या शेतातील चारा पिकावर याचा परिणाम होऊन जनावरांमध्ये आजार वाढले आहेत. कंपनीत धडक मोर्चा व प्रशासनास निवेदन देऊन उपयोग होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
एक तास आंदोलन झाल्यानंतर नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांनी आंदोलकांची समजूत काढून आपल्या
भावना वरिष्ठांना कळविल्या जातील, असे सांगितले. यानंतर आंदोलन मागे घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक
आशिष शेळके, आरोग्य अधिकारी डॉ. रजनीकांत पुंड, मंडलाधिकारी फिरोज सय्यद, कामगार तलाठी रामहरी आघाव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here