आशाताई बच्छाव
राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त मोठ्या संख्येने उपस्थित रहावे_विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे
संजीव भांबोरे
पुणे _दिनांक २६ जून २०२४ रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त “सामाजिक न्याय दिन” साजरा करणेबाबत
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णयान्वये दि. २६ जून २०२४ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्यात येते. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने डिसेंबर १९८७ मध्ये पारित केलेल्या ठरावानुसार हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिवस म्हणूनही साजरा केला जातो.
या निमित्ताने समाजातील सर्व घटकांना सामाजिक न्यायाचे महत्व सांगणे, व्यसनमुक्ती बाबत प्रबोधन करणे या अनुषंगाने जाणीव निर्माण करणे व माहिती देण्यासाठी बुधवार, २६ जून २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता राजीव गांधी अॅकेडमी ऑफ ई-लर्निंग स्कुल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, अनुराग सोसायटी, शिवदर्शन पूरग्रस्त वसाहत, पर्वती पायथा, पुणे येथून श्री. शाहू मंदीर महाविद्यालय, पर्वती पायथा, पुणे पर्यंत विद्यार्थ्याची रॅली व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यांस अभिवादन व पुष्पहार अर्पण असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.