आशाताई बच्छाव
पंढरपूर भुयारी गटार योजने साठी 121 कोटी मंजर करावेत माजी आ. प्रशांत परिचारक यांची मागणी
सोलापूर जिल्हा बिरो चिफ ज्ञानेश्वर निकम युवा मराठा न्यूज नेटवर्क
पंढरपूर- शहराचा होणारा विस्तार व दैनिक येणारे भाविक यांचा विचार करता पंढरपूरच्या चौथ्या टप्प्यातील भुयारी गटार योजनेसाठी 121 कोटी रुपये मंजूर करावेत अशी मागणी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली आहे: याबाबतचा प्रस्ताव पंढरपूर नगरपरिषदेने तयार करून शासनाकडे पाठवला आहे. महाराष्ट्रातील राज्यातील पंढरपूर अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनाकरिता राज्यातील व इतर राज्यातील लाखो भाविक दरवर्षी आषाढी, कार्तिकी,माघी व चैञी अशा चार याञा कालावधीत येत असतात. तर दररोज 50 हजार भाविक देखील हजेरी लावतात.तसेच पंढरपूर शहर व उपनगर विकसित होत असून वाढती लोकसंख्या पाहता भुयारी गटार क्र.4 करणे गरजेचे आहे यापूर्वी पंढरपूर शहरात शासनाने भुयारी गटार योजनेचे तीन टप्पे राबविली असून त्या अनुषंगाने भुयारी गटार योजना टप्पा क्र.4 साठी केंद शासन पुरस्कृत स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत पंढरपूर भुयारी गटार योजनेसाठी 121.69कोटींचा डीपिआर बनवून प्रस्ताव तांत्रिक मंजुरी करिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे सादर केलेला आहे नव्या भुयारी गटार योजना टप्पा क्र.4 मध्ये टाकळी,गणेश नगर,कासेगाव रोड परिसर,इसबावी गावटाण परिसरातील कामे प्रामुख्याने होणार आहेत.परंतु मागील काही महिन्यांपासून आचासहिता असल्यामुळे हा प्रस्ताव रखडला होता. आता भुयारी गटार योजने टप्पा क्र.4 साठी तातडीने राज्य स्तरीय समितीमध्ये मंजूरी घावी अशी मागणी मा.आ. प्रशांत परिचारक राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुखमंत्री मा. श्री अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे.