Home नांदेड युवकाची हत्या की आत्महत्या ?

युवकाची हत्या की आत्महत्या ?

121
0

आशाताई बच्छाव

1000490786.jpg

युवकाची हत्या की आत्महत्या ?

नांदेड(विशेष प्रतिनिधी शिवाजी धुमाळे)- जवळपास 30 वर्षीय युवक अजब पध्दतीने मरण पावल्याचा प्रकार पाकीजा फंक्शन हॉलच्या एका झाडाजवळ दिसून आला आहे. प्रेताची परिस्थिती पाहता त्याने आत्महत्या कशी केली असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या संदर्भाने काही देण्याघेण्याचा व्यवहार होता असे मयत व्यक्तीचा भाऊ पोलीसांना सांगत असतांना अनेकांनी ऐकले आहे.
आजचा सुर्योदय झाल्यानंतर पाकिजा फंक्शन हॉलच्या पाठीमागील नाल्यात झाडाजवळ मिर्झा शाहेद बेग मिर्झा जावेद बेग या 30 वर्षीय युवकाचे प्रेत फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसले. या प्रेताची पाहणी केली असता चिकटपट्या लावून आत्महत्या केली असल्याचे दिसत असले तरी चिकटपट्या लावून आत्महत्या केल्याचा एकही प्रकार आजपर्यंत पाहायला मिळाला नाही. सोबतच मयत मिर्झा शाहेद बेगचे पाय गुडघ्यापासून जमीनीला टेकलेले आहेत . ही हत्या की,आत्महत्या याचा शोध घेण्याचे काम आता नांदेड ग्रामीण पोलीस करत आहेत

Previous articleशेतीच्या ओलीती साठी पाणी उपलब्ध करा: भाजप खासदार अनिल बोंडे यांची जलसंपदा विभागाकडे मागणी.
Next articleपिंपरी चिंचवड येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेचा सत्कार संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here