Home अमरावती तरुणाचा गळा आवरून खून: आत्महत्या दर्शविण्यासाठी मृतदेह रेल्वे मार्ग टाकला, ब्लॅंकेट मध्ये...

तरुणाचा गळा आवरून खून: आत्महत्या दर्शविण्यासाठी मृतदेह रेल्वे मार्ग टाकला, ब्लॅंकेट मध्ये आढळला मृतदेह.

132
0

आशाताई बच्छाव

1000486096.jpg

तरुणाचा गळा आवरून खून: आत्महत्या दर्शविण्यासाठी मृतदेह रेल्वे मार्ग टाकला, ब्लॅंकेट मध्ये आढळला मृतदेह.
दैनिक युवा मराठा
पी.एन
देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे पासून जाणाऱ्या नागपूर ते मुंबई रेल्वे मार्गावर शुक्रवारी (दि.२१) सकाळी आठ वाजता एका तरुणाचा मृतदेह ब्लॅंकेट मध्ये गुंडाळून असल्याचे आढळले होते. दरम्यान या मृताची ओळख पटली असून मारेकऱ्यांनी त्याचा गळा आवरून आत्महत्या दर्शनासाठी मृतदेह रेल्वे मार्गावर आणून टाकला हा खून अनैतिक संबंधित झाल्याचे दाट संशय पोलिसांनी वर्तवला असून पोलीस मारेक-याचा शोध घेत आहे. गजानन नथू राठोड वय ३५. पहुर, ता. बाभुळगाव, यवतमाळ असे मृत्यू तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी धामणगाव रेल्वे शहरा बाहेर असलेल्या रेल्वे पुलाखाली रेल्वे मार्गावर एका तरुणाचा मृतदेह ब्लँकेट मध्ये गुंडाळलेला नागरिकांना दिसला त्यावेळी तात्काळ ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ पाहून मृतदेहाची पाहणी केली, त्यावेळी पोलिसांनी मृतकाच्या खिशातील कागदपत्राची पाहणी केली त्यामध्ये खिशात असलेल्या एक एका खरेदी बिलावर गजानन राठोड पहुरअसे लिहिले होते. त्यावरून पोलिसांनी पहूर गाठून मृतकांची ओळख पटवली. मृतांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मारेकरांचा शोध सुरू केला मात्र शुक्रवारी सायंकाळपर्यंत पोलिसांना मारेकरी मिळाले नव्हते. दरम्यान गजानन चा खून अनैतिक संबंधातूनच जाण्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. गजाननच्या एका महिला नातेवाईकासोबत नात्यातीलच एका तरुणाची अनैतिक संबंध असून ती महिला व नातेवाईक करून या दोघांनी मिळून झाल्यानंतर काटा काढला, अशा निष्कर्ष प्रत ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीचे पथक पोचले आहे. मात्र शुक्रवारी सायंकाळपर्यंत पोलिसांना मुख्य आरोपी हातात आला नव्हता.

Previous articleपंकजाताई मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार !
Next articleराजरत्न आंबेडकर यांच्या आंदोलनाला सरकारने आडकाठी आणू नये याकरिता त्यांच्या समर्थनार्थ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here