Home बुलढाणा बुधवत साहेब जरा जीभ आवरा हो.. – शिवराळ भाषाने विधानसभेत मावळणार अशा?...

बुधवत साहेब जरा जीभ आवरा हो.. – शिवराळ भाषाने विधानसभेत मावळणार अशा? – म्हणे गांडूची औलाद नाही

53
0

आशाताई बच्छाव

1000485840.jpg

बुधवत साहेब जरा जीभ आवरा हो.. – शिवराळ भाषाने विधानसभेत मावळणार अशा? – म्हणे गांडूची औलाद नाही
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीप
बुलढाणा :– डोक्यावर बर्फ तोंडात साखर ठेवली तर जग जिंकता येते. मात्र अती केली तर माती होऊ शकते. सांगायचे कारण की, उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांना शिवराळ भाषा चांगलीच भोवणार आहे. ‘आम्ही गांडूची औलाद नाही, उद्या आघाडी होईल किंवा नाही होईल.. असे सांगताना उबाठा जिल्हा प्रमुखाने महाविकास आघाडीलाच डिवचले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चांगलाच परिणाम दिसून येईल अशी चर्चा आहे.
बुलढाणा लोकसभेत महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांचा महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी दारुण पराभव केला आणि आज ते केंद्रीय राज्यमंत्री झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतरबुलढाणा येथील गर्दै सभागृहात शिवसेना उबाठाचा कार्यकर्ता मेळावा तसेच नवनिर्वाचित खासदार व पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांचा सत्कार 20 जुनला दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी आपल्या भाषणात जाहीररीत्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागत निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला. पुढे बोलतांना ते म्हणाले की अनेक लोक म्हणायचे उद्या महाविकास आघाडी होईल का? युती होईल का?? अरे आम्ही गांडूची औलाद नाही, गांडीला पाय लावून पळणारे नाही, उद्या जे होईल ते होईल, अशा प्रकारे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्याकडून महाविकास आघाडीलाच डीवचण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याआगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाला चांगलाच परिणाम भोगावा लागणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Previous articleकोपरगावचा शारदा शाळेत १८०० विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी केली एकत्रित योगसाधना.
Next articleअमरावती ग्रामीण ची भरती रद्द नव्हे, पावसामुळे मैदानी चाचणी पुढे ढकलली!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here