Home नांदेड नांदेड येथे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उत्साहात आयोजन

नांदेड येथे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उत्साहात आयोजन

50
0

आशाताई बच्छाव

1000485479.jpg

नांदेड येथे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उत्साहात आयोजन

जिल्हाधिकारी,सिईओ यांच्यासह अनेक संघटनांचा सहभाग क्रीडा विभागाच्याआयोजनाला विद्यार्थ्याचा प्रतिसाद.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड दि. 21:- ‍जिल्हा प्रशासनाच्यावतीने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवार २१ जूनला सकाळी6.30 वा. श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन नांदेड येथे उत्सहात साजरा करण्यात आला.शेकडोच्यासंख्येने उपस्थित आबालवृद्ध आणि प्रशिक्षकांच्या निर्देशात झालेल्या योग प्रात्यक्षिकाचा सर्वानी अनुभव घेतला. या मुख्य शासकीय समारोहासोबतच शहर व जिल्हयात ठिकठिकाणी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

सकाळी 7 वाजता श्री.गुरुग्रंथ साहिबजी भवन येथे यासाठी योगाभ्यास करणाऱ्या विविध संस्था व वेगवेगळ्या शाळामहाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण चमूने सुदर आयोजन या ठिकाणी केले होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्तडॉ. महेशकुमार डोईफोडे,जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे,याच्या उपस्थितीत सकाळीबरोबर 7 ला योग दिनाच्या आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार कार्यक्रमाला सुरुवात झाली.सर्वयोग आसनाची पूर्तता उपस्थित सर्व आबालरुद्धांनी प्रशिक्षकांसोबत केली.

सामुहिक योगा कार्यक्रमाअंतर्गत आज प्रार्थना, चल क्रिया व खडे आसान, बैठे आसन, पोटावरचे आसन व पाठीवरचे आसन, प्राणायामध्यान ,शांतिपाठ इत्यादी योग क्रिया घेण्यात आल्या. अनेकांनी आज प्रथमच योगाभ्यास केलात्यांनी या कार्यक्रमाचे व त्याच्या आयोजनाचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी व उपस्थितअधिकाऱ्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. योग दिन हा कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरा करण्यासाठीशासकीय विविध विभागातील सर्व कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभाग,जिल्हा परिषद, सर्व शैक्षणिक संस्था, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा पुरस्कारार्थी,खेळाडू व मागदर्शक, स्कॉऊट गाईड, एन.एस.एस., एन.सी.सी., योग संघटना इत्यादी विभागाचेकर्मचारी उपस्थित होते. नांदेड शहरासोबतचजिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, ग्रामपंचायतच्यावतीनेगावागावातील नागरिकांनी योग दिनाचे ठिकठिकाणी आयोजन केले होते.. आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केल्याची सविस्तर माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यासाठी सविस्तर माहितीwww.ayushdsonanded.dsys-mh@gov.in,dsonanded@rediffmail.com या ई-मेलवर फोटोसह कार्यक्रमआयोजनाचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

केंद्र शासनाने 21 जून 2024 हा दिवस 10 वा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देशदिले असून संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगादिन म्हणून दरवर्षीसाजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीययोगा दिन म्हणून जगभरात मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो.

आजच्या आयोजनात जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्य.) माधव सलगर,जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, ने.यु.कें. जिल्हा युवा अधिकारी श्रीमती चंदारावळकर, जिल्हा संघटक गाईड श्रीमती शिवकाशी तांडे, संजय बेतीवार क्रीडा अधिकारी, राज्यक्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंडेकर, शिवकांता देशमुख, क्रीडा मार्गदर्शक,बालाजी शिरसीकर,चंद्रप्रकाश होनवडजकर, टी. एन. रामनबैनवाड नांदेड जिल्हा योग संघटनेचे मान्यवर उपस्थितहोते. त्याचबरोबर गजानन हुगे (प्रतिनिधी, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन,नांदेड), आर.डी. केंद्रे (योग विद्या धाम), सुरेश येवतीकर (योग विद्या धाम), प्रलोभ कुलकर्णी (क्रीडाभारती),गंगाबिशन कांकर (गिता परिवार),किशन रंगराव भवर (प्रतिनिधी, क्रीडा भारती), रामशिवपनोर (भारत स्वाभिमान न्यास, पतंजली), सुरेश लंगडापुरे (पतंजली योग समिती), नागोरावपोटबदवार (सचिव योग विद्याधाम नांदेड), डॉ. अवधूत पवार (इंटरनॅशनल नॅपरोपॅथी ऑर्गनायझेशन,नांदेड),बालाजी लंगडापुरे (आय.एन.ओ. जिल्हा संघटक नांदेड), एस.गंगाधर पाटील (आय.एन.ओ. सचिव,नांदेड), शिवा बिरकले (आर्ट ऑफ लिव्हींग), शिवाजीराजे पाटील (आर्ट ऑफ लिव्हींग) आदींचीउल्लेखनीय उपस्थिती होती.

Previous articleवाशिममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस महोत्सव अप्रतिम उत्साहात साजरा
Next articleविधान परिषदेची १ सीट जिल्ह्यातील ओबीसी वा इतर समाजाला द्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here