Home नांदेड जिजाऊ ज्ञानमंदिरात योग दिन साजरा.

जिजाऊ ज्ञानमंदिरात योग दिन साजरा.

21
0

आशाताई बच्छाव

1000485365.jpg

जिजाऊ ज्ञानमंदिरात योग दिन साजरा.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

मुखेड दि. २१ येथील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक योगदिन प्रात्याक्षिकासह विद्यार्थ्यांच्या सहभागाने उत्साहात संपन्न झाला.
यावेळी युवा योगगुरू विठ्ठल कोळनुरे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रात्याक्षिकासह विविध योगासनाचे सादरीकरण केले. त्यांचे पाहून सर्व विद्यार्थ्यांनी योगासने करून दाखवली. आपले शारिरीक व मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग साधना किती महत्वाची आहे याचे मार्गदर्शन ही योगगुरु विठ्ठल कोळनुरे यांनी केले. चांगली स्मरणशक्ती व कुशाग्र बुद्धीमतेसाठी मानसिक आरोग्य ठीक असावे लागते. त्यासाठी सकाळी नियमित व्यायाम महत्वाचा आहे असे मार्गदर्शन यानिमित्ताने मुख्याध्यापक जगदीप जोगदंड यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी पर्यवेक्षक सुधाकर जोगदंड यांनीही जागतिक योग दिन व २१ जून हा दिवस सर्वात मोठा दिवस असून हा योगदिन जगभर साजरा केला जात आहे. आरोग्यम् धनसंपदा … उद्याचे उज्वल भविष्याचे नागरिक आजच्या विद्यार्थ्यांचे चांगले आरोग्य असणे ही देशासाठी महत्वाची बाब आहे. निरोगी विद्यार्थीच उज्वल भविष्य घडवू शकतात. चांगला अभ्यास करून चांगले यश मिळवू शकतात हा विचार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी यावेळी चांगला प्रतिसाद दिला व आनंद उत्साहात योगदिन साजरा झाला. संचालक ज्ञानोबा जोगदंड यांनी योग प्रशिक्षक विठ्ठल कोळनुरे व सहकारी आर्य रेड्डी सर यांचा सत्कार केला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous articleजिजाऊ ज्ञानमंदिरात योग दिन साजरा.
Next articleयोग दिनात ५०० नागरिकांनी केली योग प्रात्यक्षिके जिल्हास्तरीय कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here