Home नांदेड देगलूर मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..!

देगलूर मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..!

72
0

आशाताई बच्छाव

1000484626.jpg

देगलूर मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..!

देगलूर तालुका प्रतिनिधी- (गजानन शिंदे)

देगलूर – देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या संकल्पनेतून योगगुरू बाबा रामदेव जी यांच्या मार्गदर्शनात देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन गेल्या अनेक वर्षांपासून साजरा होत आहे त्याच पार्श्वभूमीवर देगलूर शहरातील मध्यवस्तीमध्ये असलेले आर्य समाज मंदिर येथे भारतीय जनता पार्टी देगलूर शहर तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला..
यावेळी विविध योगासने जसे की अनुलोम विलोम, कृपाल भारती, भस्रिका, भ्राह्मरी, उदगीत, शीर्षासन, सूर्य नमस्कारासन आदी योगासने व व्यायाम शिकविण्यात आले. योगशिक्षक योगाचार्य कृष्णा पाटील जी यांनी योगाचे महत्त्व समजून सांगितले व नित्य नियमित योगासने केल्याने शरीर निरोगी आणि सुदृढ राहते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टी देगलूरचे शहराध्यक्ष प्रशांत दासरवार यांनी केले तर सरचिटणीस दीपक संगमकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सरचिटणीस मुकुंद भुताळे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला भाजप नेते देगलूर महाविद्यालय देगलूर चे उप प्राचार्य उत्तमकुमार कांबळे सर, भाजपाचे शहराध्यक्ष प्रशांत दासरवार, भाजपा जिल्हा चिटणीस रणजीत हिंगोले पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष माधव पाटील पाळेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बालाजी पाटील थोटवाडीकर, शहर सरचिटणीस दीपक संगमकर, सरचिटणीस मुकुंद भुताळे, तालुका सरचिटणीस संजीव पांचाळ, माजी सरचिटणीस गंगाधर दाऊलवार, शहर उपाध्यक्ष बाबू भंडारवार, युवा मोर्चा चे सौरव मधुरवार, सहकार आघाडी चे प्रदीप पाटील सक्करगे, विधी आघाडी चे अवधूत राजकुंडवार, ओबीसी चे मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी, गिरीश पबितवार, राजू अऊलवार, बालाजी कांबळे, उमाकांत मुंडकर आदी पदाधिकाऱ्यांसहित समवेत अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
योग शिबिरासाठी आर्य समाज मंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दल विजय जी उनग्रतवार (बंडू काका), डॉ. अविनाश जी नामावार, अभय जी कळसकर सर यांचे आभार.
आयोजक – भारतीय जनता पार्टी देगलूर शहर.

Previous articleदेगलूर महाविद्यालय,देगलूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न..
Next articleशनिचौथऱ्याचा पाया तयार दगडाची घडण पूर्ण; भाविकात उत्सुकता 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here