Home नांदेड धर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

धर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

39
0

आशाताई बच्छाव

1000482440.jpg

धर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड दि. 19 :- धर्माबाद शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 18 जून 2024 रोजी धर्माबाद शहरात अचानक धाडी टाकून एकूण 30 तंबाखू विक्रेत्यांकडून 14 हजार रुपये दंड आकारण्यात आला.

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील व वैद्यकीय अधिक्षक डॉ. वेणुगोपाल पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील, जिल्हा सल्लागार डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक नितीन आडे व केस रजिस्ट्री सहाय्यक सुनील तोटेवाड तसेच धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कुमरे व पोलीस कॉन्स्टेबल सुपारे उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Previous articleएन.डी. आर. एफ. पुणे येथील पथक जिल्ह्यात दाखल आपत्ती व्यवस्थापनाचे जिल्ह्यात देणार प्रशिक्षण….
Next articleगेला पाऊस कुणीकडे, राज्यात पावसाने फिरवली पाठ तूमच्या जिल्हात किती पडला पाऊस पहा?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here