Home जळगाव तळेगावच्या तरुणाची आत्महत्या.. घातपात झाल्याच्या आरोप मृतदेह आणला पोलीस ठाण्यात..

तळेगावच्या तरुणाची आत्महत्या.. घातपात झाल्याच्या आरोप मृतदेह आणला पोलीस ठाण्यात..

114
0

आशाताई बच्छाव

1000476348.jpg

तळेगावच्या तरुणाची आत्महत्या..
घातपात झाल्याच्या आरोप मृतदेह आणला पोलीस ठाण्यात..

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यातील तळेगाव येथील 24 वर्षीय तरूणाने प्रेमभंगाच्या नैराश्याने शेतात कडूलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 18 रोजी सकाळी 7 वाजेच्या पूर्वी घडली आहे . मात्र तरुणाने आत्हत्या केली नसून त्याचा घातपात करण्यात आल्याचा आरोप करीत मृत तरूणाच्या नातलगांनी त्याचा मृतदेह ग्रामीण पोलीस ठाण्यात आणला.
जोपर्यंत संबंधीताच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही असे सांगत नातलगांसह समाजबांधवांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच ठिय्या दिला. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.या घटनेची चौकशी करून त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर सायंकाळी सहा वाजता मृतदेह तळेगाव येथे नेण्यात आला
घटनेची माहिती अशी की, आज दि.18 रोजी प्रदीप मुकुंदा गायकवाड(24) रा. तळेगाव हा कृष्णानगर तांडा शिवारात अजय इंदल राठोड यांच्या शेताच्या बांधावर कडू लिंबाच्या झाडाच्या फांदीला देार बांधून गळफास घेतल्याने मृतावस्थेत मिळून आला.या घटनेची माहिती मिळताच नागरीकांनी धाव घेतली. ग्रामीण पोलीसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात नेला.
याप्रकरणी कृष्णा सुका गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृृत्युची नोंद करण्यात आली.प्रदीप गायकवाड याने प्रेमभंगाच्या नैराश्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, त्याची चौकशी व्हावी असे दिलेल्या खबरीत म्हटले आहे.
घातपाताचा संशय अन मृतदेह पोलीस ठाण्यात
मात्र मयत प्रदीप याने गळफास घेतला नसून त्याचा घातपात केल्याचा संशय त्याच्या कुटुंबियाने करत प्रदीप याचा मृतदेह शववाहिकेतून दुपारी दोन वाजता थेट चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आणला. प्रदीप गायकवाड याचा घातपात करणार्‍यांविरूद्ध जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्याचा मृतदेह इथून नेणार नाही असा पवित्रा घेत नातलगांसह समाजबांधवांनी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या दिला.
तब्बल चार ते पाच तास मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारातच शववाहीकेत पडून होता.पोलीस अधिकार्‍यांनी मृत तरूणाच्या नातेवाईकांची समजून काढून कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र गुन्हा दाखल झाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका घेतल्याने परिस्थिती गंभीर होती.अखेर या प्रकरणाची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्याचे ठोस आश्‍वासन पोलीस अधिकार्‍यांनी दिल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास मृत तरुणाच्या नातलगांनी ठिय्या मागे घेत मृतदेह तळेगाव येथे नेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here