
आशाताई बच्छाव
हवेली/पुणे प्रतिनिधी श्री संजय वाघमारे : छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी यूपीएससी परीक्षा मध्ये गोंधळ, छत्रपती संभाजी नगर मध्ये यूपीएससीची परीक्षा होत असताना, काही 50 विद्यार्थ्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. झाले असे की, छत्रपती संभाजी नगर मध्ये यूपीएससीची परीक्षा चालू आहे. त्या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी अनेक विद्यार्थी लांबून येत असतात. त्यांनी मॅप मध्ये ज्यावेळेस परीक्षेचा पत्ता टाकला तो पत्ता त्या विद्यार्थ्यांना परीक्षेत सेंटर पासून जवळपास 20 किलोमीटर वरती एमआयडीसी या ठिकाणी घेऊन गेला. तिथे पोहोचल्यानंतर ज्यावेळी विद्यार्थ्यांना समजले की या ठिकाणी परीक्षा होत नाही, माघारी स्वामी विवेकानंद महाविद्याल परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत त्या विद्यार्थ्यांना दोन मिनिटांचा उशीर झाला होता. नऊ वाजून दोन मिनिटांनी त्या ठिकाणी ते विद्यार्थी पोहोचले होते. परीक्षेचा टाईम होता नऊ. फक्त दोन मिनिट उशीर झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तेथील शिक्षकांनी परीक्षा वरती बसू दिले नाही. त्यांना प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांना यूपीएससीच्या परीक्षा मधून बाहेर पडायला लागले. जवळपास बाहेरून येणाऱ्या 50 विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. यूपीएससी मध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतलेली असते अनेक प्रकारच्या अभ्यासावरती त्यांनी लक्ष घातलेले असते. एवढे सर्व करून सुद्धा फक्त मॅपच्या चुकीच्या दिशेमुळे,पत्त्यामुळे हा कधीही भरून न निघणारा त्रास सहन करावा लागला. या सर्व 50 विद्यार्थ्यांनी एकच मागणी केली आहे की यावरती काहीतरी पर्याय सुचवा.