Home युवा मराठा विशेष ” स्वामी तिन्ही जगाचा आई बापा विना भिकारी

” स्वामी तिन्ही जगाचा आई बापा विना भिकारी

91
0

आशाताई बच्छाव

1000468797.jpg

” स्वामी तिन्ही जगाचा आई बापा विना भिकारी ”

वडिलांचा अर्थ काय? त्याची व्याख्या करणे कदाचित शक्य होणार नाही. कारण वडिलांचे प्रेम हे कोणत्याही व्याख्येपुरते मर्यादित असू शकत नाही, म्हणूनच धर्मग्रंथांमध्येही बाप असणे म्हणजे पतंगाच्या दोऱ्याप्रमाणे आहे. पतंगाप्रमाणे जोपर्यंत ते दोऱ्याला बांधलेला असतं , तोपर्यंत शिस्तबद्ध राहून आकाशावर राज्य करतं. पण पतंग जेव्हा दोऱ्यापासून वेगळ होत तेव्हा ते मार्गहीन होतं आणि इकडे तिकडे भटकायला लागत
पिता सुद्धा आपल्या जीवनाचा हाच दोरा आहे आणि धाग्यात बांधले जाणे हे शिस्तीचे प्रतिक आहे. मात्र, आजकालच्या तरुण पिढीला जीवनात फारशी शिस्त आवडत नाही. पण सत्य हे आहे की शिस्तीशिवाय आयुष्यात काहीच नाही.
आईकडेप्रेम व्यक्त करण्यासाठी ममता आणि कधी कधी अश्रूही असतात.
हे अश्रू प्रेम आणि भावनांचे अश्रू आहेत. पण वडिल ना तो रडून आपले प्रेम किंवा भावना व्यक्त करू शकतो.
वडील नेहमी पडद्यामागे असतात . जो कोणी पाहू शकत नाही. परंतु त्यांच्याशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे.
वडिलांचे प्रेम दिसत नाही, कारण त्यांचे प्रेम देवासारखे असते आणि फक्त अनुभवता येते…
आणि म्हणून भारतीय अध्यात्म आणि वेद, पुराणांमध्ये पित्याचे महत्त्व अधोरेखित असल्याचे दिसून येते
चाणक्य म्हणतात,
“जनिता चोपनेता च, यस्तु विद्यां प्रयच्छति।
अन्नदाता भयत्राता, पंचैते पितरः स्मृताः॥”
अर्थ असा की जन्म देणारा, उपनयन देणारा, ज्ञान देणारा, अन्न देणारा आणि भय देणारा हा पिता असतो..
पित्याला आधीपासूनच पालक, पोषक और रक्षक म्हटल्या गेलं आहे.
त्याचप्रमाणे रामायणाच्या अयोध्या कांड मध्ये पित्याची सेवा करणे आणि त्यांच्या आत्म्याचे पालन करणे यापेक्षा मोठा धर्म नाही. असे म्हटल्या गेल आहे.
“न तो धर्मचरणं किंचिदस्ति महत्तरम्‌।
यथा पितरि शुश्रूषा तस्य वा वचनक्रिपा॥”
वाल्मिकी रामायण (अयोध्या कांड )

वडील हे नारळासारखे असतात .
बाहेरून कणखर आणि आतून मऊ अशा वडिलांसमोर बहुतेक मुलांना आपल्या भावना उघडपणे मांडता येत नसतील. पण आईबरोबरच वडिलांजवळ सुद्धा मुलांचे चेहरे वाचण्याचे कौशल्य असते.
“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ”
हे तुम्ही ऐकलं असेल आणि ते अगदी खरं आहे मात्र बापाशिवाय
सुद्धा मुलगा अपूर्ण असतो असे म्हणणे वावगे ठरणार नाही .

जून महिन्याचा तिसरा रविवार हा जागतिक फादर्स दिवस म्हणून केला जातो..
म्हणून आजचा हा दिवस जगातल्या सर्व पित्यांसाठी…..

लेख :रमेश रामराजे शिंदखेडा 

Previous articleभूतलावरील उष्णता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे:- आमदार लहू कानडे…..         
Next articleश्रीरामपूर तालुक्यातील प्रश्न सोडविण्यास आपण कटिबद्ध – खा. वाकचौरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here