Home अमरावती श्री ह.व्यां.प्र.मंडळा मध्ये 15 जून ला जागतिक मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला...

श्री ह.व्यां.प्र.मंडळा मध्ये 15 जून ला जागतिक मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला .

54
0

आशाताई बच्छाव

1000467131.jpg

श्री ह.व्यां.प्र.मंडळा मध्ये 15 जून ला जागतिक मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला .
दैनिक युवा मराठा
पी एल देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.

संपूर्ण जगामध्ये 15 जून हा दिवस जागतिक मल्लखांब दिवस म्हणून साजरा करण्यात येतो यावर्षी सुद्धा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती व अमरावती जिल्हा मल्लखांब संघटनेच्या संयुक्त विद्वामाने 15 जून 2023 रोजी श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मल्लखांब यरीना मध्ये मंडळाच्या सचिव डॉ.माधुरी चेण्डके यांच्या अध्यक्षते खाली समाज सेवक मां सुरेश रतावा डॉ.संजय तीरथकर प्रा. विलास दलाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जागतिक मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला. मल्लखांब संघटना दरवर्षी अमरावती शहरांमध्ये कुठे ना कुठे मल्लखांब चे प्रात्यक्षिके साजरे करून जागतिक मल्लखांब दिवस साजरा करतात .या वर्षी संस्थेच्या आवारामध्येच मलखांचे प्रात्यक्षिके साजरे करून जागतिक मलखांब दिवस साजरा झाला. कार्यक्रमाचे संचालन आशिष हाटेकर यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. विलास दलाल यांनी करून मल्लखांब चा संपूर्ण इतिहास सांगितला.डॉ. संजय तीरथकर यांनी श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने मल्लखांब विषय बद्दल योगदान जागतिक स्तरावर कसे केले या विषयी माहिती दिली.रतावांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. डॉ.माधुरी ताई नी मल्लखांब चे जनक बाळभट्ट व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे आद्य संस्थापक गुरुवर्य अंबादास पंत वैद्य यांनी दूर दृष्टी ठेवून 1936 व 1971 साली बर्लिन व म्युनिच ऑलम्पिक मध्ये भारताचा मलखांब चमू विदेशात पाठवून प्रात्यक्षिक दिली. तेव्हापासून मंडळ जागतिक स्तरावर भारतीय व्यायाम पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करत आहे. अशी माहिती देऊन मल्लखांब खेळाडूंना मार्गदर्शन केले व मलखांब दिनाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. व खेळाडू द्वारे मलखांब चे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
मल्लखांब दिवस यशस्वी करण्याकरता प्रा संतोष इंगोले, अनिल नागपुरे, मयूर दलाल अथक परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here