Home जालना सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश बोर्डे यांचा मानव सेवा मंडळातर्फे सत्कार

सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश बोर्डे यांचा मानव सेवा मंडळातर्फे सत्कार

91
0

आशाताई बच्छाव

1000466055.jpg

सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश बोर्डे यांचा मानव सेवा मंडळातर्फे सत्कार
माहोरा प्रतिनिधी -मुरलीधर डहाके
दिनांक 15/06/2024
जाफराबाद तालुक्यातील सावरगाव म्हस्के जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बोर्डे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या ३७ वर्षाच्या सेवाकार्याचा गौरव करीत येथील सेवाभावी संस्था मानव सेवा मंडळातर्फे गुरुवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक गणपत भिताडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षक शेख जमीर, माजी सैनिक रामेश्वर जंगले, वाचनालयाचे प्रमुख रावसाहेब अंभोरे यांची मंचावर विशेष उपस्थिती होती. यावेळी सुरेश बोर्डे यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन मंडळातर्फे गौरवण्यात आले. यासोबतच त्यांच्या वर्ग मित्रांतर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी सुरेश बोर्डे यांच्या यशस्वी सेवाकार्याचा आपल्या भाषणातून गौरव केला. सेवाकाळात सहकारी शिक्षक, मित्रपरिवार, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे मिळालेले प्रेम आपण कधीही विसरू शकणार नाही असे भावोद्गार यावेळी सुरेश बोर्डे यांनी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलकेश सोमानी यांनी केले. तर संजय राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला राधाकिसन लहाने, संजय निकम, रमेश साळवे, सावता तिडके, प्रा. एस. पी. वाघमारे, सुनील अंभोरे, ज्ञानेश्वर उखर्डे, नसीम शेख, बालाजी शेवाळे, कैलास देशमुख, गोविंद जाधव, बालाजी मगर, सुनील पवार, काशिनाथ उखर्डे, भास्कर गोफणे, शौकत बागवान आदींची उपस्थिती होती.

Previous articleआरटीओ कडून होणाऱ्या दंडात दुप्पट ते पाचपट वाढ; वाहन चालविणाऱ्यांनो नियमांचे पालन करा
Next articleशिवसेना शिंदे गटाच्या देगलूर तालुकाध्यक्षपदी गंगाधर तामलूर यांची निवड.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here