Home बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील चक्रीवादळ व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ दयावी

बुलढाणा जिल्ह्यातील चक्रीवादळ व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ दयावी

60
0

आशाताई बच्छाव

1000427247.jpg

बुलढाणा जिल्ह्यातील चक्रीवादळ व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ दयावी .
सामाजिक कार्यकर्त्या प्रेमलता ताई सोनोने यांची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडे मागणी .
जळगाव . नरेंद्र पाटील . युवा मराठा जळगाव जिल्हा विभागीय संपादक. . मागील आठवड्यात दि. २६/०५/०२४ रोजी अचानक आलेल्या चक्री वादळ व पूर्व मोसमी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नांदुरा मोताळा बुलढाणा शेगांव खामगाव जळगाव संग्रामपुर सह संपूर्ण जिल्ह्यातील या वादळामुळे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच या वादळामुळे बळी राजाला खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले . शेत पिकाचे तसेच शेतीला पूरक उद्योग धंदे यांचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक जनावरे मृत्यू मुखी पडले , काही ठिकाणी जीवित हानी सुध्दा झाली . बरेच कुटुंब हे उघड्यावर आले आहेत. घरे पडली . पत्रे उडाली . विजेची खांब पडून तार तुटली . अशा परिस्थितीत बऱ्याच गावामध्ये आजपर्यंत लाईट नाही . पाणी नाही . जीवनावश्यक सुविधा उपलब्ध होत नाही . अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे . नुकसान ग्रस्त शेतकरी, शेतमजूर आतुरतेने आपल्या मायबाप सरकारकडे पहात आहे. तरी ग्रामसेवक, तलाठी , तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी सर्वे आणि नोंदी चा फॉर्स करू नये . शासकीय GR चे कारण पुढे करीत तहसीलदानी घर पडणे, पत्रे उडणे , विजेची खांब पडणे , जखमी व मृत्यू मुखी यांना कोणताच मोबदला देता येत नाही असे कारण सांगू नये तर झालेल्या नुकसान ग्रस्त भागाची पहाणी सम्पूर्ण वस्तुनिष्ठ सर्व्हे करून नुकसान ग्रस्तांना या नैसर्गिक आपत्ती मध्ये नुकसान भरपाई करून मदत देण्यात यावी ही विनंती .असे निवेदन प्रेमलता ताई सोनोने यांनी केले.

Previous articleशहरातील धक्कादायक घटना जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या….
Next articleबागलाण तालुक्यात शिताफळ  लागवडीस पोषक  वातावरण 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here