Home बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई चोरी गेलेल्या 73 मोबाईलचा लावला शोध स्थानिक...

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई चोरी गेलेल्या 73 मोबाईलचा लावला शोध स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई चोरी गेलेल्या 73 मोबाईलचा लावला शोध..

47
0

आशाताई बच्छाव

1000427229.jpg

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई चोरी गेलेल्या 73 मोबाईलचा लावला शोध स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई चोरी गेलेल्या
73 मोबाईलचा लावला शोध..
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर

बुलढाणा :-चोरट्याने सर्वच ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजारात भर दिवसा मोबाईल हरवल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. सदर घटनेकडे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर घटनेची गांभीरतेने दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांना तांत्रिक विश्लेषण विभाग सायबर लॅब यांच्याकडून जिल्हा पोलीस घटकात हरवलेल्या गहाळ झालेल्या मोबाईल संबंधित ची माहिती प्राप्त करून घेतली व मोबाईलचा शोध घेण्याचा आदेश सुद्धा जाहीर केला.
स्थानिक गुन्हे शाखेने या तपासात गती वाढवली. पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी पो.हे.का.गजानन माळी,पो.काॅ. सुभाष वाघमारे यांचे पथक तयार करून तांत्रिक विश्लेषण विभाग सायबर लॅब बुलढाणा यांच्याकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे सदर पथकाने जिल्ह्यातील तब्बल 73 चोरी गेलेल्या मोबाईलचा तपास लावला.
स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केलेले मोबाईल संबंधित मूळ मालकास परत करण्याच्या हेतूने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा येथे मोबाईल वाटप संदर्भातील विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या हस्ते मोबाईल संबंधित मूळ मालकास परत करण्यात आलेले आहे.
ही धडाकेबाज कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने व अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुमार सानप पो.हे.काॅ गजानन माळी,पो.काॅ. सुभाष वाघमारे, तांत्रिक विश्लेषण विभाग सायबर लॅब चे राजू आडवे, पवन मखमले, कैलास ठोंबरे, ऋषिकेश खंडेराव, उषा वाघ यांच्या पथकाने मोबाईलचा शोध घेऊन 73 गहाळ झालेल्या मोबाईल विविध ठिकाणाहून एकत्र तर मूळ मालकास परत करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे.

Previous articleइयत्ता ३ री ते १२ वि इयत्तांच्या पाठ्यक्रमातून मनाचे श्लोक, भगवद्गीता, मनुस्मृति वगळून
Next articleशहरातील धक्कादायक घटना जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here