Home भंडारा इयत्ता ३ री ते १२ वि इयत्तांच्या पाठ्यक्रमातून मनाचे श्लोक, भगवद्गीता, मनुस्मृति...

इयत्ता ३ री ते १२ वि इयत्तांच्या पाठ्यक्रमातून मनाचे श्लोक, भगवद्गीता, मनुस्मृति वगळून

76
0

आशाताई बच्छाव

1000426505.jpg

इयत्ता ३ री ते १२ वि इयत्तांच्या पाठ्यक्रमातून मनाचे श्लोक, भगवद्गीता, मनुस्मृति वगळून

 ऐवजी बुद्ध, संत तुकाराम, महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज व भारताचे संविधान पाठ्यक्रमात समाविष्ट करा– चंद्रत्याशेखर टेंभुर्णे माजी समाज कल्याण सभापती

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ मसुदा, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, मार्फत तयार करण्यात आले आहे
ह्या आराखड्याचा उपयोग अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी होणार असल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. भारत सरकारने २०२० मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले. त्या धोरणानुसार सण २०२३ मध्ये राष्ट्रीय शालेय शिक्षणाचा आराखडा प्रसिद्ध केला. राज्य अभ्यासक्रम आराखडा हा केंद्र शासनाच्या पायाभूत अभ्यासक्रमाच्या आराखड्याशी सुसंगत असाच आराखडा तयार केल्याचे दिसत आहे. मात्र महाराष्ट्राच्या गरजा, वैशिष्ट्ये, परंपरा ह्या विचारात घेऊनच हा आराखडा तयार करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र राज्याच्या गरजा, आपल्या परंपरा, ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी, महाराष्ट्रातील विविधता तसेच महाराष्ट्राचे देश पातळीवरील आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक योगदान यांचे प्रतिबिंब अभ्यासक्रमात व पाठ्यपुस्तकात दिसावे असे अपेक्षा होती. मात्र सदर अहवालात हे दिसत नाही. उलट सदर आराखड्यात संविधानाच्या तात्विक चौकटीला सेंध करून , पुन्हा या देशात विषमतावादी मनुवाद आणून बहुजन समाज व महिलांना गुलाम करण्याचे षडयंत्र दिसून येते.
*अहवालात खालील मुद्द्यांच्या समाविष्ट आहे.
पान ८० वर=७ भाषा-मध्ये
१) मनाचे श्लोक १ ते २५(३ ते ५ वर्ग)
२) मनाचे श्लोक २६ ते ५०(६ ते ८ वर्ग)
३) भगवद्गीता अध्याय १२ वा (९ ते १२ वर्ग)
पान ८९-४ शालेय संस्कृती मध्ये पंचतंत्र, हितोपदेश, विक्रम- वेताळ, रामायण, महाभारत यांच्या कथा प्रेरणादायी म्हणून घेतले आहे.
पान ८४-२ मुले आणि स्वभाव वृत्ती- मध्ये सेवा आदर विद्या यश व बळ देणारा म्हणून मनुस्मृतीचा श्लोक संदर्भ म्हणून घेतले आहे.
*
शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ मध्ये रामदास स्वामी, भगवद्गीता, रामायण, महाभारत, विक्रम -वेताळ यांच्या विचारांना प्रेरणादायी म्हणून घेतले आहे.
परंतु हे सर्व व्यक्ती विषमतावादी, वर्णवादी ,असून या देशातील बहुजन समाज व महिलांना हजारो वर्ष गुलाम म्हणून जगण्यास भाग पाडणारे आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षणाच्या माध्यमातून पुन्हा विसमतावादी, वर्णवादी व अर्थहीन विक्रम- वेताळ थोतांड कथा मुलांच्या डोक्यात घालून, महाराष्ट्रातील मुलांना दैववादी बनवून त्यांच्या आयुष्य बरबाद केले जात आहे. म्हणून असले विसमतावादी, वर्णवादी व तथ्यहीन विचार अभ्यासक्रमातून शिकविण्या ऐवजी पुरोगामी, विज्ञानवादी, सर्वधर्मसमभाव व बंधुभाव वाढवणारे विचार सांगणारे तथागत बुद्ध, संत तुकाराम, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिवीर भगतसिंग व भारतीय संविधान हे अभ्यासक्रमात समाविष्ट करावे. जेणेकरून राज्यातील व देशातील येणारी पिढी ही न्याय, समतावादी, मानवतावादी, विज्ञानवादी व भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणारे खरे देशभक्त निर्माण होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here