Home भंडारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार 2024 विष्णुदास लोणारे यांना प्राप्त

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार 2024 विष्णुदास लोणारे यांना प्राप्त

44
0

आशाताई बच्छाव

1000421946.jpg

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार 2024 विष्णुदास लोणारे यांना प्राप्त

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या विस्तारित राज्य कार्यकारणी इस्लामपूर जिल्हा सांगली येथे आयोजित केली होती. या वेळी भंडारा जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता विष्णुदास लोणारे यांना लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार 2024 डॉ. भारत पाटणकर ज्येष्ठ विचारवंत श्रमिक मुक्ती दलाचे नेते यांच्या हस्ते आज दिनांक 1जून 2024 रोजी यांना मानचिन्ह,प्रमाणपत्र आणि पुस्तक देऊन, सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, संजय बनसोडे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका चे संस्थापक मंडळ प्रा. नितीन शिंदे, डॉ. गोराणे, उत्तम जोगदंड, तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी भंडारा येथून दशरत शहारे उपस्थित होते .या पुरस्काराबद्दल प्रा.युवराज खोब्रागडे, प्रा. नरेश आंबीलकर, प्रकाश नाकतोडे, नितेश बोरकर, माया बारापात्रे, अजय वासनिक, अश्विनी भिवगडे, त्रिवेनि वासनिक ,कविता लोणारे, पुरुषोत्तम कांबळे, पुरुषोत्तम गायधने ,संजय कटारे ,चंद्रशेखर भिवगडे, चंद्रशेखर खोब्रागडे, डॉ. विश्वजीत थुलकर ,डॉ. नरहरी नागलवाडे यांनी अभिनंदन केले .

Previous articleजुगार अड्ड्यावर छापा, आठ जणांवर गुन्हा दाखल; तब्बल ‘इतक्या’ हजारांचा ऐवज जप्त
Next articleबेटाळा येथील संस्कार शिबिरात उपविभागीय पोलिस अधिकारी रष्मिता राव ‌यांच्या हस्ते पुस्तकाचे विमोचन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here