Home बीड पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मुख्याधिकारी अन् पदाधिकारी भर उन्हात तलावावर

पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मुख्याधिकारी अन् पदाधिकारी भर उन्हात तलावावर

57
0

आशाताई बच्छाव

1000421924.jpg

पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मुख्याधिकारी अन् पदाधिकारी भर उन्हात तलावावर

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/वडवणी दि ०१ जून २०२४ वडवणी तालुक्यातील सोन्ना खोटा तलावातील पाणी पातळी घटल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये पाणी येत नाही म्हणून गेल्या दोन दिवसापासून शहरांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली. त्यावर तातडीने उपाययोजना करून शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वडवणी नगर परिषदचे मुख्याधिकारी, पदाधिकारी ऐन उन्हात दिवसभर तलावावर थांबून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. वडवणी शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत असलेल्या सोन्ना खोटा येथील धरणाची पाणी पातळी घटल्याने पाणीपुरवठ्याच्या विहिरीत पाणी येत नसल्याने शहरातील नागरिकांना पाणी टंचाई निर्माण होत असल्याने शहराला वेळचेवेळी व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण, नगराध्यक्ष पती शेषराव जगताप, पाणीपुरवठा सभापतीसह नगरपंचायतच्या वतीने तलावातील पाणी विहीरमध्ये घेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्यात येत आहेत. नगरपंचायत चे पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी तलावातील विहिरीवर असून काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन दिवसात तलावातील पाणी विहिरीत घेण्यात येईल व पाणीपुरवठा सुरळीत होईल यासाठी नगरपंचायत चे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असून जनतेने पाण्याची टंचाई लक्षात घेता पाण्याची बचत करावी व पाण्याचा वापर काटकसरीने करावा. असे आव्हान नगरपंचायत च्या वतीने नगराध्यक्ष पती शेषेराव जगताप, मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी केले आहे.

Previous articleखामखेडा येथील गिरणा नदीपात्रात मेंढपाळाचा बुडून मृत्यू
Next articleकेजचा तहसीलदार फरार ? तर कोतवाल अडकला एसीबीच्या जाळ्यात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here