आशाताई बच्छाव
खामखेडा येथील गिरणा नदीपात्रात मेंढपाळाचा बुडून मृत्यू
देवळा प्रतिनिधी,भिला आहेर तालुका प्रतिनिधी:- देवळा तालुक्यातील खामखेडा गिरणा नदीच्या पात्रात मेंढया पाजण्यासाठी आलेल्या मेंढपाळा
या बाबत सविस्तर माहिती अशी कि सध्या गिरणा नदीला पाणी सोडले असल्याने दुपारच्या वेळेस मेंढपाळ मेंढीना पाणी पाजण्यासाठी नदीवर येतात. तेव्हा धुळे जिल्हातील साक्री तालुक्यातील वाघापूर येथील मेंढपाळ खामखेडा येथे मेंढ्या
चारण्यासाठी खामखेडा येथे आलेले आहेत. तेव्हा दुपारी तीन वाजेच्या सुमारास मेंढ्याना पाणी पाजण्यासाठी गिरणा नदीवर गेले मेंढ्यांना पाणी पाजूना झाल्यानतर मेंढ्यांना जवळच्या झाडा खाली बसविल्या. त्यातील दोन मुले कपडे धुण्यासाठी नदीकडे गेले,एक कपडे धूत होता. तर दुसरा रवी सीताराम खताळ हा धुतले बनियान नदीच्या पाण्याचा पात्रात पिळण्याच्या वेळे बनियन हातातून निसटले. तेव्हा ते पकडण्याच्या नदात नदीच्या खोल पात्रात बुडाला तेव्हा दुसऱ्या मुलाने आरडा ओरड केली तेव्हा झाडाच्या सावली खाली बाकी बसलेल्या मेंढपाळ नदीकडे धावले याचा वेळेस गिरणा नदीच्या पुलावर खामखेडा येथील सरपंच वैभव पवार व भऊर पत्रकार बाबा पवार हे गिरणा पुलावर जातं असताना त्यांना मेंढपाळाचा ओरडणायाचा आवाज आला त्याचवेळी योगेश सोनवणे यांचाही फोन आल्याने त्यांनी तात्काळ गावातील पोहणाऱ्यांना घेऊन नदीत गेले आणि त्या मुलाच्या शोधात पाण्यात उतरत असणाऱ्या मेंढपाळाना थाबविले त्यामुळे पुढील अनर्थळा टळला .
त्यांनतर लोहनेर येथील पोहण्याऱ्या बोलविले. परंतु अथक तीन तास प्रयत्न करून मृत्यू देह सापडला नाही. अंधार पडल्याने मदत कार्य थांबविण्यात आले. यावेळी देवळा पोलीस अधिकाऱ्यांनी ज्ञानेश्वर जाधव, साहायक पोलीस निरीक्षक विनय देवरे, पोलीस कोरडे, मंडळ अधिकारी मनोहर गांगुर्डे,घटनास्थळी भेट दिली.या घटनेचे माहिती परिसरात पसरल्याने नदीवर मोठ्या प्रमानात बाध्याची गर्दी झाली हो