Home जालना पंचवीस हजार कोटी रुपयांच्या कामांचे टेंडर काढण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी

पंचवीस हजार कोटी रुपयांच्या कामांचे टेंडर काढण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी

37
0

आशाताई बच्छाव

1000418438.jpg

जालना(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)पंचवीस हजार कोटी रुपयांच्या कामांचे टेंडर काढण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणाऱ्या राज्य सरकारकडून राज्यातील दुष्काळी उपाययोजना आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आदर्श आचारसंहितेचा बागुलबुवा दाखवला जात असल्याची घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलतांना केली.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जवखेडा येथे संत्रे कुटुंबावर झालेला हल्ला आणि त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्या घराची झालेली तोडफोड तसेच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आज गुरुवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.जवखेडा येथे भेट देऊन त्यांनी विमलबाई बाबूराव संत्रे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला.त्यानंतर भोकरदन व बदनापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी देऊन शेतकरी,ग्रामस्थांशी संवाद साधला.या दौऱ्यानंतर जालना शहरातील हॉटेल अंबरमध्ये दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी जालना लोकसभा मतदार संघातील मविआचे उमेदवार डॉ.कल्याण काळे,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले,माजी आमदार चंद्रकांत दानवे,शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद,माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, कल्याण दळे, महीला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नंदा पवार,माजी गटनेते गणेश राऊत,आपचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे,जालना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंत जाधव आदींची उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की,राज्यात सध्या भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Previous article18-जालना लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्र परिसरात आवश्यक सुविधा व्यवस्थितपणे उपलब्ध कराव्यात
Next articleजळलेल्या मोसंबी बागांचे पंचनामे करून अनुदान द्या       सतीश घाटगे यांचा प्रशासनास इशारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here