Home बुलढाणा दुकानातून २६ हजाराचा मोबाईल चोरट्याने केला लंपास….

दुकानातून २६ हजाराचा मोबाईल चोरट्याने केला लंपास….

30
0

आशाताई बच्छाव

1000418401.jpg

दुकानातून २६ हजाराचा मोबाईल चोरट्याने केला लंपास….
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
शेगाव :-येथील खेतान चौकातून अज्ञात इसमाने मोबाईल लंपास केल्याची घटना घडली.याबाबत नीतीन बद्रीप्रसाद अवस्थी वय ४२ वर्ष यांनी पोलिसात फिर्याद दिली की, एक अनोळखी इसम दुकानात आला व त्याने त्याचे जवळचे कागदपत्र मला दाखवले व मला काही पैशाची मदत करा असे मला म्हणाला त्यावेळी तो मला कागदपत्र दाखवत असतांना माझा सॅमसंग कंपनीच ए ३३ आकाशी रंगाचा मोबाईल ज्यामध्ये बीएसएनएल कंपनीचे सीमव जीओ कंपनीचे सीम ज्याचा आयएमईआय३५०९९५४१५८४८३०५ असलेला माझा मोबाईल की अं २५, ९९९/- माझ्या दुकानाचे काउंटर वर ठेवलेला होता. सदर अनोळखी इसम कागदपत्र दाखवुन भीक मागुन दुकानातुन निघून गेल्यानंतर मी माझे दुकानाचे काउंटर वर ठेवलेला माझा मोबाइल दिसून आला नाही.
तरी माझे दुकानात पैसे मागण्याकरीता आलेल्या अनोळखी इसमाने माझा वर नमुद वर्णनाचा मोबाइल चोरुन नेला आहे अशा फिर्यादी चे तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here