Home भंडारा शारदा विद्यालय तुमसरचा निकाल 98.42 टक्के (शारदा विद्यालयाचा अक्षित योगेश भुरे तालुक्यातून...

शारदा विद्यालय तुमसरचा निकाल 98.42 टक्के (शारदा विद्यालयाचा अक्षित योगेश भुरे तालुक्यातून द्वितीय 95.20 टक्के,तर प्रांजल चंद्रकांत लांजेवार तालुक्यातून तृतीय 94.60 टक्के)

130
0

आशाताई बच्छाव

1000417275.jpg

शारदा विद्यालय तुमसरचा निकाल 98.42 टक्के
(शारदा विद्यालयाचा अक्षित योगेश भुरे तालुक्यातून द्वितीय 95.20 टक्के,तर प्रांजल चंद्रकांत लांजेवार तालुक्यातून तृतीय 94.60 टक्के)

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने फेब्रुवारी – मार्च महिन्यात घेतलेल्या इयत्ता दहावी च्या निकालात शारदा विद्यालय तुमसरने भरारी घेतली.या शाळेच्या निकालाची टक्केवारी 98.42 आहे.या शाळेचा विद्यार्थी अक्षित योगेश भुरे याने 95.20 टक्के गुण घेवून तुमसर तालुक्यात द्वितीय आला आहे.तर प्रांजल चंद्रकांत लांजेवार याने 94.60 टक्के गुण घेवून तालुक्यात तृतीय आला आहे.एकूण 127 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.125 विद्यार्थी पास झाले.प्राविण्य श्रेणीत 56 ,प्रथम श्रेणीत 47,द्वितीय श्रेणीत 22 विद्यार्थी पास झाले.या शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे.याच शाळेतील आदित्य गणेश भोयर 93 टक्के,अविनाश दिपक पटले 91.80 टक्के, कु.तेजस्विनी कृष्णकांत गिरी 90.80 टक्के , कु.दिव्यांनी चित्तरंजन हाके 90.80 टक्के , कु.श्वेता तुळशीराम बावणे 89.80 टक्के गुण प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक राहुल डोंगरे ,ज्योती बावनकर,दिपक गडपायले,संजय बावनकर,श्रीराम शेंडे,नितुवर्षा मुकुरणे,प्रीती भोयर,वासू चरडे, रूपराम हरडे,विद्या मस्के,सीमा मेश्राम,अशोक खंगार,नलिनी देशमुख, सुकांक्षा भुरे,प्रशांत जिवतोडे,अंकलेश तिजारे,नारायण मोहनकर,दिपक बालपांडे, झंकेश्वरी सोनवाणे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पेढे भरवून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.या यशस्वी विद्यार्थ्यांचे पूजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महाबिरप्रसाद अग्रवाल,सचिव रामकुमार अग्रवाल यांनी कौतुक केले आहे.

Previous articleमी फिट तर कुटुंब फिट,कुटुंब फिट तर समाज, समाज फिट तर माझा देश फिट’
Next articleसरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त’नागसेन’ ला मिळणार 70 डझन वह्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here