Home अमरावती अमरावती शहरात सव्वातीन लाख रुपयाचा पंधरा किलो गांजा जप्त. दोन आरोपी पोलिसांच्या...

अमरावती शहरात सव्वातीन लाख रुपयाचा पंधरा किलो गांजा जप्त. दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

67
0

आशाताई बच्छाव

1000413444.jpg

अमरावती शहरात सव्वातीन लाख रुपयाचा पंधरा किलो गांजा जप्त. दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
दैनिक युवा मराठा
पी. एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती शहरात वाढत्या व्यसनधनातील आळा घालण्यासाठी गेल्या काही दिवसापासून स्थानिक पोलीस सक्रिय झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून बुधवारी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोन पोलिसांनी १५ किलो गांजा सह ३ लाख २८ हजार ५५० रुपयाचा मध्यमाल जप्त केला. पोलिसांनी याप्रकरणी अमरावती येथील जाकीर खान वल्द रहमत खान,रा. ताज नगर वय ४०,व छत्रपती कचरूजी बांबोडे वय ६०रा. लंबानी नगर या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १५ किलो ४२५ ग्रॅम गांजा तसेच दोन मोबाईल फोन आणि रोख ८ हजार ५० रुपये असा एकूण ३ लाख २८ हजार ५५० रुपयाचा ऐवजही ताब्यात घेतला. त्यांच्याविरुद्ध एन डी पी एस ऍक्ट विविध कलमाने गुणा नोंदविण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. नवीन चंद्र रेड्डी, उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील व कल्पना बारवकर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. दरम्यान शहर गुन्हे शाखा युनिट सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान भुयार कर योगेश इंगळे, उपनिरीक्षक संजय वानखडे ,सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र काळे यांनी महत्त्वाची भूमीका बजावली. अमरावती मोर्शी मार्गावर राडगाव कडून अमरावती कडे येणाऱ्या एका व्यक्तीकडे मोरपंखी रंगाची बॅग असून त्या बॅगेत गांजा असल्याची माहिती एका गुप्त सूत्राकडून पोलिसांना मिळाली होती. ही नेमकी माहिती गणेशाची च्या प्रमुखांना त्या भागात पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना मिळाली होती. ही मुलगी माहिती गुन्हे शाखेच्या प्रमुखांनी त्या भागात पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनातील आपल्या चमुला दिली. पुढे या चिमणे उत्कृष्ट छापणार असून आरोपींना ताब्यात घेतले.

Previous articleलग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार: फोटो व्हायरल ची धमकी.
Next articleमतमोजणीच्या पुर्वतयारीचा आढावा पलाडी येथील व्यवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here