Home बीड गाळ वाहतुकीचे टिप्पर देत आहेत अपघाताला निमंत्रण; ताडपत्री टाकून वाहतुकीसाठी प्रशासनाने सक्ती...

गाळ वाहतुकीचे टिप्पर देत आहेत अपघाताला निमंत्रण; ताडपत्री टाकून वाहतुकीसाठी प्रशासनाने सक्ती करावी

77
0

आशाताई बच्छाव

1000412406.jpg

गाळ वाहतुकीचे टिप्पर देत आहेत अपघाताला निमंत्रण; ताडपत्री टाकून वाहतुकीसाठी प्रशासनाने सक्ती करावी

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड  सध्या जिल्ह्याभरातील जवळपास तलाव आटत आल्याने त्यातील गाळ शेतीसाठी उपयुक्त असल्याने आटलेल्या तलावातील गाळ शेतकऱ्यांनी घेऊन जावे म्हणून प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. यामुळे अनेक तलावातील गाळ शेतकरी बांधव घेऊन जात आहेत. गाळ घेऊन जात असताना टिप्पर जास्त प्रमाणात भरले जात आहे. सध्या वादळ वाऱ्याचे दिवस असल्याने वरपर्यंत भरलेल्या टिप्पर मधून गाळ उडून रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांच्या डोळ्यात जात असल्याने डोळ्यात जात असल्याने अशा प्रकारे करण्यात येत असलेली गाळची वाहतूक अपघाताला निमंत्रण देणारी ठरणार असल्याने याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन गाळ वाहतूक करणाऱ्या टिप्परांना ताडपत्री झाकून वाहतूक करण्याची सक्ती करावी. अशी मागणी जनतेतून होत आहे. तलावातील गाळ शेतीसाठी अत्यंत उपयुक्त व पोषक असल्याने ते बहुमूल्य आहे. आटलेल्या तलावातील गाळ काढल्याने दुहेरी फायदा होतो. एकतर शेतकऱ्यांना शेतात टाकून शेत सुपीक करण्यासाठी तर दुसरे तलावातील गाळ कमी झाल्याने तलावाची साठवण क्षमता वाढते. म्हणून तलाव असल्यास त्याच्यातील गाळ काढून नेणे हे दुहेरी फायद्याचे असते. यामुळे सध्याच्या दुष्काळात जिल्हाभरातील अनेक तलाव आटल्याने त्यातील गाळ काढून घेऊन जाण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे. म्हणून शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आटलेल्या तलावातील गाळ काढून घेऊन जात आहेत. परंतु हे गाळ काढून घेऊन जात असताना जी दक्षता बाळगाला हवी ती दक्षता बाळगली जात नसल्याने गाळ वाहतूक करणाऱ्या टिप्परकडे पाहिल्यावर दिसून येत आहे. एक तर टिप्पर वरपर्यंत भरले जात आहे. त्यावर कुठलेही आच्छादन न टाकता तशीच उघडी वाहतूक करण्यात येत आहे. यामुळे टिप्पर चा वेग आणि वारा यातून मोठ्या प्रमाणात गाळ उडून पादचारीसह दुचाकी स्वारांच्या डोळ्यात जात आहे. यामुळे अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून गाळ वाहतूक करणाऱ्या टिप्परला आच्छादन टाकून वाहतूक करण्याची सक्ती टिप्पर धारक व चालकांना करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here