Home भंडारा विद्यमान जिल्हापरिषद अध्यक्ष यांचे कडून बेकायदेशीररित्या ५०-६० टीप्पर लाखों रुपयाचे मुरूम बिना...

विद्यमान जिल्हापरिषद अध्यक्ष यांचे कडून बेकायदेशीररित्या ५०-६० टीप्पर लाखों रुपयाचे मुरूम बिना परवानगीने चोरी

129
0

आशाताई बच्छाव

1000412360.jpg

विद्यमान जिल्हापरिषद अध्यक्ष यांचे कडून बेकायदेशीररित्या ५०-६० टीप्पर लाखों रुपयाचे मुरूम बिना परवानगीने चोरी

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) – भंडारा जिल्हा परिषद चे विद्यमान अध्यक्ष यांच्याकडून बेकायदेशीररित्या 50 60 टिप्पर लाखो रुपयाचे मुरूम बिना परवानगीने चोरी केल्याची माहिती सदर प्रतिनिधीला उपलब्ध झाली असून सविस्तर वृत्त असे की,डॉ.मिलिंद यरणे लॉ कॉलेज कोसरा – कोंढा लागुन असलेल्या गाव चुल्हाड गट क्र.८२८ शेती व बोडीतील दि.२१/०५/२०२४ रोजी स.७.०० वाजता श्री.चेतन वामनराव जिभकाटे यांनी श्री. बालू जिभकाटे यांची JCB आणून मुरमाचे खोदकाम केले. व ट्रक क्र.MH ३६ AA ४६९९,MH F ३६९९ ह्या ट्रक नी हे मुरूम विध्यमान जिल्हापरिषद चे अध्यक्ष श्री.गंगाधर जिभकाटे यांच्या स्वतः च्या मालकीच्या ‘ मालची ‘ गावातील राईसमील समोर जागेत टाकण्यात आला. हे प्रकरण दि.२२/०५/२०२४ ला डॉ.मिलिंद येरने यांना लक्षात येताच त्यांनी श्री.चेतन वामनराव जिभकाटे यांना विचारणा केली असता सांगितले की,कनिष्ठ अभियंता, लघुपाटबंधारे विभाग,पवनी यांच्या आदेशानुसार हे मुरूम विद्यमान जिल्हापरिषद चे अध्यक्ष श्री.गंगाधर जिभकाटे यांचे मालकीच्या जागेत टाकण्यात आले आहे.असे सांगितले.त्यांना तहसीलदार पवनी, ग्रामपंचायत कार्यालय, कोसरा यांचे कडून खोदकाम करण्याची परवानगी घेतली आहे काय असे विचारले असता त्यांनी सांगितले की,सरकार आम्हीच आहोत,त्यामुळे परवानगी घेण्याची आवश्यकता नाही,असे उद्धट भाषेत उत्तर दिले.त्यानंतर डॉ.मिलिंद येरने यांनी ग्रामपंचायत कार्यालय, कोसरा,तहसील कार्यालय,पवनी,कनिष्ठ अभियंता लघुपाटबंधारे विभाग,पवनी, व पोलीस स्टेशन,अड्याळ ला चोरी गेलेल्या मुरमाची तक्रार दिली.५०-६० टीप्पर मुरूम बेकायदेशीर कोणतीही शासनाकडून परवानगी न घेता पदाचा व राजकीय शक्तीचा वापर करून प्रशासनाला हाताशी धरून जी.प.भंडारा चे विद्यमान अध्यक्ष यांनी लाखोंचा मुरूम हडपलेला आहे.असे दि.२६/०५/२०२४ ला डॉ.मिलिंद येरने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लघु पाटबंधारे विभाग पवनी,चे कनिष्ठ अभियंता श्री. हेडाऊ यांना भ्रमणध्वनी द्वारा विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, चुल्हाड गट क्र.८२८ व गट क्र.१२१५ मधील ५०-६० टीप्पर मुरूम चोरी गेले असल्याचे सांगितले ते कुठे गेले याची माहिती नाही.तसेच या जागेतील मुरूम चे खोदकाम करण्याची ल.पा.विभाग पवनी,किंव्हा तहसील कार्यालय,पवनी कडून परवानगी सुद्धा दिलेली नाही.परंतु डॉ.मिलिंद येरने यांनी दिलेल्या तक्रारी वरून चौकशी करून कायदेशीर कारवाही करण्यात येईल असे कनिष्ठ अभियंता श्री.हेडाऊ ल.पा.विभाग पवनी यांनी पत्रकारांना भ्रमणध्वनी द्वारा माहिती सांगितले.या बेकायदेशीर रित्या शासनाची पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीर रित्या लाखोंचा मुरूम चोरी झाल्याच्या तक्रारीवर चौकशी करून कारवाही प्रशासनाकडून जर झाली नाही तर या बाबद मा.न्यायालय,यांच्याकडे दाद मागण्यात येईल.मुरूम कोणी खोदकाम केले,कोणाच्या गाडीने नेले,आणि कुठे टाकले याचे सगळे फोटो हे डॉ.मिलिंद येरने यांचे कडे उपलब्ध असल्याचे पुरावे पत्रकार परिषदेत दाखविले आहे.

Previous articleराधिका सोनवणे या विद्यार्थिनी ची यशोगाथा
Next articleभोयेगाव विद्यालयाचा दहावीचा १००% निकाल.!! गायत्री जाधव ९३.४०% गुण मिळवून प्रथम —
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here