Home भंडारा शिवाजी विद्यालय ईटान च्या विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेत उंच भरारी निकाल – 96.92%

शिवाजी विद्यालय ईटान च्या विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेत उंच भरारी निकाल – 96.92%

124
0

आशाताई बच्छाव

1000412174.jpg

शिवाजी विद्यालय ईटान च्या विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेत उंच भरारी निकाल – 96.92%

संजीव भांबोरे
भंडारा ,(जिल्हा प्रतिनिधी)लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले एक छोट्स गाव त्या गावाची ओळख म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील अनेक गोरगरिब शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांना घडविणारे एकमेव शिक्षण संस्था म्हणजे शिवाजी विद्यालय ईटानच नाव पुढे येते. या वेळी सुद्धा दरवर्षी प्रमाणे यंदाही
विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेत उच्च भरारी घेतली आहे. असे म्हणायला हरकत नाही .नुकताच दि.२७ मे २०२४ ला दहावी बोर्डाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 चा निकाल जाहीर करण्यात आला त्यामध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही वाढीव निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये
परीक्षेला बसलेले विद्यार्थी – 65
उत्तीर्ण विद्यार्थी – 63
प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थी-18
प्रथम श्रेणीतील विद्यार्थी – 32
द्वितीय श्रेणीतील विद्यार्थी – 13
नापास विद्यार्थी – 02
विद्यालयाच्या एकूण निकाल – 96.92%
साहिल प्रभाकर हजारे 85.50,
कु.दिव्या सुनिल ठेंगरी 83.40,
वेदान रामरतन बावनकर 82.60,
आणि चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यालयाच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास बेंदरे आणि पालकांच्या वतीने क्रमवार गुण प्राप्त विद्यार्थ्यांच्या प्रत्येक्ष घरी जाऊन शुभेच्छा देवून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Previous articleशहरातील मान्सूनपुर्व कामांकडे वाशिम नगर परिषदेचे दुर्लक्ष – श्रीमती करुणाताई कल्ले
Next articleराधिका सोनवणे या विद्यार्थिनी ची यशोगाथा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here