Home नांदेड सगरोळी येथे वाळूने भरलेल्या हायवाच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू :नागणी, येसगी,...

सगरोळी येथे वाळूने भरलेल्या हायवाच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू :नागणी, येसगी, सगरोळी वाळू डेपोत रात्रंदिवस वाळूचे उत्खनन…!

68
0

आशाताई बच्छाव

1000410894.jpg

सगरोळी येथे वाळूने भरलेल्या हायवाच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू :नागणी, येसगी, सगरोळी वाळू डेपोत रात्रंदिवस वाळूचे उत्खनन…!

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड:- बिलोली तालुक्यातील नागणी,येसगी सगरोळी येथील वाळू डेपोतून घरकुल लाभार्थ्याच्या नावाखाली वाळूचे उत्खनन मोठया प्रमाणात चालू असल्याने दररोज मोठया अवजड वाहनाने वाळूची वाहतूक होत असून सगरोळी येथील डेपो क्रमांक दोनवरून वाळू भरून निघालेल्या एका हायवा गाडीने देगलूरकडे जाणाऱ्या मार्गावार सागरोळी बसस्टॉप जवळ एका मोटारसायकलला धडक दिल्याने दोन तरुणांचा जागेवर मृत्यू झालाआहे.वाळूवाहतुकी संदर्भात अनेकदा वृत्त प्रसारित करूनही प्रशासन गाफिल कसे असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.

बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील वाळू डेपो क्रमांक दोनवरून वाळूने भरलेल्या हायवाच्या धडकेने दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना रविवार दि. २६ मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास सगरोळी बसस्टॉप जवळ घडली आहे.
बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे सध्या दोन वाळू घाट डेपो चालू आहेत. वाळू डेपो क्रमांक दोन मधून भरून निघालेले हायवा क्रमांक एम एच ०४ एफ.जे.९७०९ हे सगरोळी येथून देगलूर कडे जात असताना समोरून येत असलेल्या दुचाकी क्रमांक टी.एस.१६ इ.वाय. ८६७८ ला जोराची धडक दिली या धडकेत दुचाकी वरील मोईन वजीरसाब शेख वय (३५ )राहणार हिप्परगा तालुका बिलोली व नवीन संग्राम पवार वय (२५ )रा. सगरोळी या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.बिलोली तालुक्यात सध्या वाळू डेपोच्या नावाखाली शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करीत ठेकेदार मंडळी रात्रंदिवस अवैधरित्या वाळूचे उत्खनन करीत आहेत.याकडे प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे…..

Previous articleनंदराज रुंजे यांनी दहावी बोर्ड परीक्षेत ९७.२० % घेऊन मिळवले घवघवीत यश.
Next articleवडसा-गडचिरोली रेल्वे लाईनच्या कामाची खासदार अशोक नेते यांच्याकडून पाहणी…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here