Home नांदेड मान्‍सून पूर्वतयारीची आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रंगीत तालीम

मान्‍सून पूर्वतयारीची आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रंगीत तालीम

78
0

आशाताई बच्छाव

1000410846.jpg

मान्‍सून पूर्वतयारीची आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रंगीत तालीम
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड दि. 27 :– जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाच्यावतीने आज सकाळी १० वाजता काळेश्वर घाट, विष्णुपूरी येथे जिल्हाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांच्‍या आदेशानुसार व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली मान्‍सून-२०२४ पूर्वतयारी-पूर परिस्‍थिती शोध व बचावाबाबत रंगीत तालीम संपन्‍न झाली.

माहे जूनमध्‍ये मान्‍सूनचे आगमन होणार आहे. मान्‍सूनच्‍या काळात अतिवृष्टी होऊ शकते. नदीकाठच्‍या गावात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा पूर परिस्‍थ‍ितीच्‍या वेळी जिवीत व वित्त हानी कशी टाळता येऊ शकते. यासाठी पूर परीस्‍थ‍ितीत शोध व बचाव कसा करावा याबाबत काम करणाऱ्या सर्व यंत्रणाचे प्रशिक्षण काळेश्‍वर घाट विष्णुपूरी येथे संपन्‍न झाले. यावेळी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, अग्‍नीशमन दल, शीघ्र प्रतिसाद दल, गृहरक्षक दल, उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालय, पंचायत समिती नांदेड व इतर अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

या रंगीत तालीमेस उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार संजय वारकड, जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, अग्‍नीशमन अधिकारी केरोजी दासरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सूत्रसंचालन जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे बारकुजी मोरे यांनी केले तर आभार तहसिल कार्यालयाचे रवि दोंतेवार यांनी मानले. यावेळी मंडळ अधिकारी पी.व्‍ही.खंडागळे, ए.एम. धुळगुंडे, एस.डी.देवापुरकर, प्रमोद बडवणे, गृहरक्षक दलाचे एम.बी.शेख, प्रवीण हंबर्डे, बालाजी सोनटक्‍के, मंडगीलवार आर.बी., गौरव ति‍वारी, कोमल नागरगोजे आदींनी परीश्रम घेतले. तर मनपा नांदेड, पोलीस क्‍यु.आर.टी., होम गार्ड,जिल्हा शल्‍य चिकित्सक कार्यालयाचे आरोग्‍य पथक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक पोलीस पाटील कोतवालासह विविध यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्‍थ‍ित होते.

Previous articleमाहोरा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Next articleआदित्य पंढरीनाथ रणवीरकरने दहावी बोर्डाच्या परीक्षेत 98.40% टक्केवारी घेऊन मिळवले यश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here