Home अमरावती मध्यप्रदेश, व महाराष्ट्राचे सराईत चोर गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात. गुन्हे शाखेच्या कडबी...

मध्यप्रदेश, व महाराष्ट्राचे सराईत चोर गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात. गुन्हे शाखेच्या कडबी बाजार युनिटची कारवाई५ लाखाचा ऐवज जप्त.

61
0

आशाताई बच्छाव

1000404498.jpg

मध्यप्रदेश, व महाराष्ट्राचे सराईत चोर गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात. गुन्हे शाखेच्या कडबी बाजार युनिटची कारवाई५ लाखाचा ऐवज जप्त.
___________
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती. अमरावती सह गजानन धाम रेवसा, चांदूर बाजार, अकोट, शेगाव, तेल्हारा येथे घर फोडी करून महागड्या वस्तूवर डल्ला मारणाऱ्या महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सराइत चोरट्यांना शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलीस आयुक्ताच्या नेतृत्वातील कडवीबाजारी युनिट ने ही कारवाई केली. सदर छोट्या कडून ५ लाख ३५ हजार रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या मध्ये तेजस संजय दरेकर वय 22 रवी नगर कांडोली परतवाडा, वीरेंद्र सोभाराम नागेश्वर वय ४० कीरपाणी-गोणखेडा ता. नेपानगर जि. बऱ्हाणपूर मी.प्र.,व अमोल सुरेश देशमुख वय ३६, मारकी, त्या.भातकुली.जि.अमरावती
या तिघांचा समावेश आहे. याशिवाय रोशन सरदार रा. परतवाडा, हल्ली मुक्काम वलगाव. हा हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. वलगाव पोलीस ठाण्यांतर्गत मार्गी या गावात अमोल देशमुख यांच्या घरी काही अनोळखी इसम राहायला आले असून ते दिवसा घरी असतात व रात्री बाहेर जातात. शिवाय त्यांच्याद्वारे पैशाची बऱ्यापैकी उद्धारपट्टी केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे ही कामे करण्यात आली. पोलिसांच्या मते यातील आरोपी अमोल देशमुख यांचा भाऊ खुनाच्या आरोपात तुरुंगात आहे. त्याचवेळी त्याच्या घरी भाड्याने राहणारा नागेश्वर हाय ही त्याच तुरुंगात होता. काही दिवसापूर्वी रोशन सरदार व संजय दरेकर या दोन्ही मित्रांना सुद्धा चोरीच्या गुन्हा तुरुंगात झाला होता. त्यावेळी त्यांची भेट वीरेंद्र नागेश्वर ची झाली. तो अमोल देशमुख यांच्या मार्ग येथील घरी राहत असल्याचे सांगत होता
पुढे या सर्वांनी आपसात संपर्क कायम राखून एकटा राहणाऱ्या अमोल देशमुख यांच्या घरालाच मुख्य केंद्र बनून त्यालाही आपल्या गटात सहभाग करून घेतले. या चोरावर उल्लेख केल्याप्रकरणी सर्वच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त डॉ. नवीन चंद्र रेड्डी, उपायुक्त कल्पना बारवकर, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात युनिट एकचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपटे सह फिरोज खान, राजू आप्पा ,सतीश देशमुख, पोलीस दिनेश नांदेड ही कारवाई केली. पोलिसांनी या कार्यवाही दरम्यान घरफोडीचे दोन पेचकस, टॉमी, लोखंडी सब्बल, या आयुद्धांसह हिरो फॅशन दुचाकी, मंगळसूत्र, कर्णभूषण, आणि अंगठी सह ५५ ग्राम सोन्याचे दागिने, हॅन्ड राईट ४ मोबाईल, व ६४१ ग्राम चांदीचे दागिने असा एकूण ५ लाख ३५ हजार रुपयांचा येऊन जप्त केला

Previous articleराष्ट्रधर्म प्रचार समितीच्या सुसंस्कार सुसंस्कार शिबिरात १९० बालकांनी गिरवले आदर्शवादाचे धडे: चित्त थरारक कवायतीचेही सादरीकरण.
Next articleस्थानिक गुन्हा शाखेची धडक कार्यवाही १० किलो गांजा पकडला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here