Home बीड आता महावितरण ॲपमध्ये विजेचे अपडेट घरबसल्या मिळणार

आता महावितरण ॲपमध्ये विजेचे अपडेट घरबसल्या मिळणार

49
0

आशाताई बच्छाव

1000373255.jpg

आता महावितरण ॲपमध्ये विजेचे अपडेट घरबसल्या मिळणार

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड  महावितरण प फोन मध्ये घेऊन विजेचे अपडेट आता घरबसल्या मिळणार आहेत. तसेच मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार, पॅन क्रमांक नोंदणी प वर शक्य होणार आहे. याचा लाभ महावितरणचे ग्राहक चुटकीसरशी मिळवू शकतात. यामुळे वीस ग्राहकांनी महावितरणचे प डाऊनलोड करून घ्यावे. असे आवाहन करण्यात आले आहे. वादळ वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. यामुळे विजेची जा – ये सतत सुरू आहे. विजेच्या तारा तुटणे, खांब वाकणे, ट्रिप होणे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. याचे अपडेट वीज ग्राहकांना मिळावे याकरिता महावितरण प प्रकाशित करण्यात आले आहे. उपकेंद्र व स्थानिक परिसरातील वीज ग्राहकांना महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्यावर माहिती देणे अपेक्षित आहे. तसेच वीज पुरवठा खंडित होण्यापूर्वी वीज ग्राहकांना सूचना मिळणे आवश्यक आहे. यासाठी महावितरण कडून ग्राहकांना काही दिवस मेसेजिंग सुविधा पुरविण्यात आली होती. मात्र स्मार्टफोनचा वाढता वापर आणि वीज पुरवठा सुविधा अत्याधुनिक व्हावी यासाठी महावितरण कंपनीने आता महावितरण प काढले आहे. यामुळे ग्राहक क्रमांकाच्या आधारे वीज ग्राहकाला स्थानिक पातळीवरील सूचना देण्यात येत आहे. इतर शुल्काचे ऑनलाइन देय, मोबाईल नंबर, ई – मेल, आधार, टीडीएस आणि पॅन क्रमांक नोंदणी बदल करता येणे शक्य आहे. या प वरून हिंदी भाषेत सेवा मिळत आहे. कारण प्रत्येक वीज ग्राहकाला इंग्रजी भाषा समजलेच असे नसते. ग्राहकाच्या तक्रारी व शंकेचे निरसण या प च्या आधारे करता येणार आहे. यामुळे सर्व वीज ग्राहकांनी महावितरण चे प डाउनलोड करून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleभंडारा जिल्ह्यातील उन्हाळी परीक्षा 2024 च्या वेळापत्रकात बदल
Next articleधक्कादायक : नक्षल्यांनी पुरून ठेवलेल्या आयइडिच्या स्फोटात दोन चिमुकल्यांचा मृत्यू।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here