आशाताई बच्छाव
जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा. नांदेड,(शिवाजी धुमाळे विशेष प्रतिनिधी)
दि.१२ मे रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी, नांदेड येथे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड च्या वतीने उस्तव समितीच्या माध्यमातून जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला.सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशमुख (अधिष्टाता ) प्रमुख पाहुणे डॉ. अश्विनी जगताप (पोलीस उप-अधीक्षक गृह-नांदेड ) नीलिमा अंबारे ( सेवा निवृत्त परिसेविका, नांदेड कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉ.वाय.एच.चव्हाण ( वैद्यकीय अधीक्षक ) मुदिराज ( अधिसेविका ) बालाजी नगराळे (प्राचार्य, नर्सिंग कॉलेज, नांदेड भीमराव चक्रे (राज्य उपाध्यक्ष, म. रा. प. स.) रेवता सामलवार ( सल्लागर, म. रा. प. स. शाखा नांदेड ) जया काळमेघ (कार्यकारी सदस्य उत्सव समिती,नांदेड ) समीर सर ( प्राध्यापक, नर्सिंग कॉलेज,नांदेड )
अल्का जाधव (वरिष्ठ परिसेविका) इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे कोषाध्यक्ष रवि शिसोदे यांनी व तसेच सुधीपा उपाध्याय व सोबत पूजा मेंढे यांनी केले.सदरील कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेडचे पदाधिकारी केशव जिंकलवाड ( सचिव ) बाळासाहेब मोरे ( कार्याध्यक्ष ), विलास कनसटवाड(उपाध्यक्ष )सुनीता शिंदे ,मुंगल अर्चना ( संघटक ),अर्चना कंधारे ( कार्यकारी सदस्य ), कस्तुरे शुभांगी ( कार्यकारी सदस्य ), छाया पांचाळ ( कार्यकारी सदस्य ),रामेश्वर पाळवदे ( सह -सचिव) ,संदीप वाघे, गिरीराज परोडवाड ( संघटक ),दिनेश पतंगे (सह-कोषध्यक्ष ) कार्यकारी सदस्य कुलदीप जोंधळे, स्टिवन साने, विश्वाबर वागतकर,अमोल केंद्रे,गोविंद मुंडे,शुभम राठोड,आदींनी अथक परिश्रम केले व तसेच उत्सव समितीच्या कार्यकारी सदस्या, जया काळमेघ, मंगल पांचाळ,सुधीपा उपाध्दाय,मेघा सरपते,प्रीती वल्लमवार,उमा चाटे, इत्यादीनीं कार्यक्रम शुशोभीत व यशस्वी होण्याकरिता अथक परिश्रम केले. सदरील कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांनी जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले व तसेच विविध खेळांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.