Home बीड बीड जिल्ह्यात विकासाची गंगा आणण्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे...

बीड जिल्ह्यात विकासाची गंगा आणण्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे – अँड.मनोज संकाये

37
0

आशाताई बच्छाव

1000362875.jpg

बीड जिल्ह्यात विकासाची गंगा आणण्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे – अँड.मनोज संकाये

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी
बीड लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे त्यामुळे राजकीय वातावरण तापले असून बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची ताकद महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्यामध्ये आहे. आशा विकासाभिमुख नेतृत्वाला संधी देऊन आपले अमूल्य मत कमळाला देऊन संसदेत पाठवा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केले आहे. बीड लोकसभा निवडणुकीमध्ये दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची कन्या पंकजाताई उभ्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याचा पंकजाताईच्या माध्यमातून विकास होईल तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचा विकास झाला त्यामुळे हा विकास अविरतपणे चालू राहणे गरजेचे असून बीडच्या सुज्ञ जनतेने येत्या १३ तारखेला कमळासमोरील बटन दाबून पंकजाताई मुंडे यांना संसदेत पाठवावे आणि बीड जिल्ह्यात विकासाची गंगा आणण्यासाठी तसेच बीड जिल्ह्याचे राहिलेले मागासलेपण दूर करण्यासाठी आणि ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही ओळख पुसून टाकण्यासाठी मतदान केले पाहिजे. ही निवडणूक ही देशाचा नेता निवडण्याची आहे, देश संरक्षणासाठी, भारत मातेच्या रक्षणासाठी, देश विकासासाठी, मा. श्री नरेंद्रजी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक खंबीर नेतृत्व देण्याची आहे आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात जिल्ह्याला भर भरून निधी देणाऱ्या ,अशा महायुतीच्या उमेदवार मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंढे यांनाच येणाऱ्या १३ तारखेला मशीन वरील एक नंबर चे बटण दाबून कमळ या चिन्हाला मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Previous articleधनंजय मुंडेंचे निवडणुकीतही पाण्यासाठी प्रयत्न; माजलगावच्या धरणातून सिंदफणा नदीपात्रात सोडले पाणी
Next articleमहात्मा बसवेश्वरांचे समाज परिवर्तन घडवण्यात मोठे योगदान- अँड.मनोज संकाये
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here