Home बीड धनंजय मुंडेंचे निवडणुकीतही पाण्यासाठी प्रयत्न; माजलगावच्या धरणातून सिंदफणा नदीपात्रात सोडले पाणी

धनंजय मुंडेंचे निवडणुकीतही पाण्यासाठी प्रयत्न; माजलगावच्या धरणातून सिंदफणा नदीपात्रात सोडले पाणी

60
0

आशाताई बच्छाव

1000362870.jpg

धनंजय मुंडेंचे निवडणुकीतही पाण्यासाठी प्रयत्न; माजलगावच्या धरणातून सिंदफणा नदीपात्रात सोडले पाणी

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/माजलगाव  नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही सर्वत्र पाण्याची अडचण, शेतात ऊस वाळतोय त्यामुळे पालकमंत्री महोदय सिंदफणा नदीपात्रात माजलगाव जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करा; अशा प्रकारची विनंती माजलगाव तालुक्यातील काही ग्रामस्थांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केले व अवघ्या दोन दिवसातच माजलगाव जायकवाडी धरणातून शिंदफणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. माजलगाव तालुक्यातील शिंपे टाकळी, रोशन पुरी, नागडगाव, सांडस चिंचोली, मनुर, लुकेगाव, दिपेगाव, आधी गावातील ग्रामस्थांनी धनंजय मुंडे यांच्यासह माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे माजलगाव धरणातून पाणी सोडण्याबाबत विनंती केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तातडीने माजलगाव धरणातील उपलब्ध जलसाठा तसेच धरणातूनपुढे जाणाऱ्या रोशनपुरी बंधाऱ्यासह विविध गावांना मिळाव्याच्या लाभाचा तातडीने विचार करून माजलगाव धरणातून पुढे पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाचे सचिव तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सूचना केल्या होत्या. त्यानुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेतला असून, आज सकाळी प्रत्यक्ष पाणी सोडण्यात आले. दरम्यान वरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह, जनावरांचे पिण्याचे पाणी, उभे पीक आदींना या पाण्याचा लाभ होणार असून एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना कोणत्याही परिस्थितीत जनतेच्या प्रश्नांची सोडवून करण्याची वृत्ती लक्षात घेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल संबंधित ग्रामस्थांकडून पालकमंत्री धनंजय मुंडे, प्रकाशदादा सोळंके यांसह संबंधित सर्वांचेच आभार व्यक्त केले जात आहेत.

Previous articleदुचाकी व एसटी बस मध्ये अपघात १ युवक ठार तर १ जखमी मूर्ती फाट्या जवळील घटना…
Next articleबीड जिल्ह्यात विकासाची गंगा आणण्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे – अँड.मनोज संकाये
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here