आशाताई बच्छाव
‘वाटा -पळवाटा’ या अभ्यासक्रमातील नाटकाच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना साहित्य अभ्यासाची प्रेरणा मिळते. – प्राचार्य डॉ. वनिता चोरे .. मयुर खापरे चांदुर बाजार
कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय चांदुर बाजार येथे दिनांक 03/04/2024 रोजी मराठी भाषा व मराठी साहित्य अभ्यास मंडळ यांच्या वतीने दत्ता भगत लिखीत ‘वाटा-पळवाटा’ या नाटकाचे सादरीकरण जेष्ठ नाट्यकर्मी श्री. सुशील दत्त यांनी केले.
सर्व पाहुण्यांचे स्वागत मराठी विभागाद्वारा पुस्तक भेट देवून करण्यात आले.
मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. अजय खडसे यांनी आपल्या प्रास्ताविकातून श्री. सुशील दत्त यांचा परिचय करून दिला. नाटक हे मराठी साहित्यातील अत्यंत महत्वाचा घटक असून नाटकाच्या अध्ययनामधील बारकावे आपणास अवगत व्हावे यासाठी अशाप्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते असे प्रतिपादन केले. याबरोबरच त्यांनी नाटक परंपरेचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडुन दाखविला.
‘ वाटा – पळवाटा’ नाटकाचे सादरकर्ते श्री. सुशील दत्त यांनी या नाटकातील जीवनशैली, नाटकांमधील पात्र, नेपथ्य, विविध पात्र, संघर्ष याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘वाटा – पळवाटा ‘ हे नाटक समजावून सांगतांना त्यांनी अनेक संवादांचे सादरीकरण वेगवेगळ्या शैलीमध्ये केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिलीत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. वनिता चोरे यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये ‘वाटा-पळवाटा’ हे नाटक विद्यापीठ अभ्याक्रमामध्ये 40 गुणांचे आहे. त्याचा अभ्यास करित असतांना अशाप्रकारच्या सादरीकरणातून विध्यार्थ्यांना असणाऱ्या शंकांचे निरसरण होते. साहित्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना साहित्य अभ्यासाची प्रेरणा मिळते. साहित्य र्निमितीस चालणा मिळते असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विपुल चुके मराठी विभाग , यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डोंगरे यांनी केले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.