आशाताई बच्छाव
अमरावती लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षाच्या वरील वयवृद्धांचे व दिव्यांगाचे घरी जाऊन, मतदानाला आजपासून सुरुवात.
___________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.दी.१२कोणताही मतदान मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच ८५ वर्षावरील वयोवृद्ध मतदार तसेच दिव्यांग मतदारासाठी घरून मतदानाची सोय घरूनच मतदान करण्याचे प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. आपापल्या घरूनच गृह मतदानाला अमरावती मतदारसंघात आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी दिव्यांग वयोवृद्ध व्यक्तींनी उस्फुर्तपणे बॅलेट पेपरद्वारे गोपनीयता बाळगत मतदान करून मतदानाचा हक्क बजावला आहे. दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक मध्ये अमरावती मतदारसंघासाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावर्षी आयोगाने ८५ वर्षाहून अधिक वय असणारे मतदार, व दिव्यांग मतदार ज्यांनी १२डी नमुना भरून दिला आहे. त्यांच्या घरी जाऊन आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया प्राप्त झालेल्या दीड.१४ एप्रिल दरम्यान होणार आहे. वय वृद्ध व दिव्यांगाच्या मतदानाची प्रक्रिया पार पडण्यासाठी विधानसभा निरह पथक तयार करण्यात आले असून या पथकामध्ये मतदान अधिकारी, सहाय्यक मतदान अधिकारी, तसेच सूक्ष्म निरीक्षक, पोलीस पथक, व्हिडिओ ग्राफर यांचा समावेश आहे. मतदानाची गोपनीयता: घरूनच मतदान करताना मतदान प्रक्रियेची गोपनीय आता पाण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यानुसार फार्म १३-ए(डिक्लेरेशन), फार्म १३-बी(कव्हर ए लिफाफा), फार्म १३-सी (कव्हरबि लिफाफा) आणि फार्म १३-डी(मतदान कसे करायचे याबाबत सूचना) आधी प्रक्रिये बाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये दिव्यांग व वय वृद्धांनी आपले मत नोंदवित आहे. मतदान प्रक्रिया गोपनीयता पाळत मतपत्रिका घडी केल्यानंतर छोट्या लिखा त्यामध्ये आणि नंतर मोठ्या टाकून सोबत असलेल्या मतपेटीत त जमा करण्यात आली आहे. सोबत सुरक्षा व्यवस्था बंदोबस्त बंदोबस्तात ही प्रक्रिया पार पडत आहे.