आशाताई बच्छाव
संस्कार प्राथमिक शाळेचा विद्यार्थी झाला प्रशासकीय अधिकारी
मी मिळविलेल्या यशात संस्कार प्राथमिक शाळेचे खूप मोठे योगदान आहे – वैभव रुपनर
मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा
बीड/परळी दि:०७ शहरातील पद्मावती शिक्षण संस्था संचलित, संस्कार प्राथमिक शाळा विद्यानगर विभागात अवघ्या दोन महिन्यात सलग पाच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वैभव रुपनर यांचा सत्कार करण्यात आला व त्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करण्यात आले.
या सत्कार समारंभासाठी पद्मावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. कैलास तांदळे सर, सचिव श्री. दीपक तांदळे सर, संस्कार प्राथमिक शाळेचे प्र.मुख्याध्यापक श्री. गायकवाड सर व श्री.अनकाडे यांची उपस्थिती होती. वैभव रुपनर यांनी सहाय्यक सहकार अधिकारी (सहकार विभाग), वरिष्ठ सहाय्यक लेखा विभाग (जिल्हा परिषद धाराशिव), विस्तार अधिकारी सांख्यिकी (जिल्हा परिषद धाराशिव), वरिष्ठ सहाय्यक (जिल्हा परिषद गोंदिया) व तलाठी या पाच परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला.वैभव रुपनर यांनी आपल्या मनोगतात आपला बालपणापासून ते यशस्वी होण्यापर्यंतचा प्रवास सांगितला. ते म्हणाले,विद्यार्थी जीवनापासूनच आपल्या अंगी शिस्त असायला हवी. हे जे वय आहे ते अभ्यासाचे व नवनवीन कला शिकण्याचे वय आहे. जर यश मिळवायचे असेल तर अभ्यासात सातत्य असायला हवे. अभ्यासामध्ये जर नियमितता ठेवली तर अशक्य गोष्टीही आपण सहजरित्या मिळू शकतो.वाचन करणे ही सवय आपण जोपासणे गरजेचे आहे.मी मिळविलेल्या यशात माझे आई- वडील व शिक्षक यांचे खूप मोठे योगदान आहे. यावेळी त्यांनी संस्कार प्राथमिक शाळेचे ही कौतुक केले ते म्हणाले, मला अभिमान वाटतो की मी ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत आज माझा माझ्या गुरुजनांकडून सत्कार होत आहे. आज आपली शाळा परळी शहरात एक उच्च दर्जाचे शिक्षण देणारी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणारी शाळा झाली आहे. शाळेची शिस्त, गुणवत्ता खरच खूप चांगली आहे. ज्याप्रमाणे आपली संस्कार प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देत आहे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत आहे तर नक्कीच पुढे चालून शाळेचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करतील. प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम असेल तर यश मिळवणे अधिक सोपे होते. आज मी जे काही यश संपादन केले आहे ते फक्त संस्कार प्राथमिक शाळेमध्ये मला मिळालेल्या चांगल्या दर्जाच्या प्राथमिक शिक्षणामुळेच यावेळी स्वागत समारंभासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.