आशाताई बच्छाव
मा. नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या निवास्थानी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम सौ.प्रतिभाताई चिखलीकर व सौ.प्रणिताताई चिखलीकर-देवरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्सवात साजरा.
लोहा प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार
मकर संक्रांति पासुन रथसप्तमी पर्यंत सुरु असलेल्या तिळ-गुळ व हळदी-कुंकवाचा कार्यक्रमाचा कार्यक्रम हिंदू संस्कृतिप्रमाणे चालू असतो. त्याचाच भाग म्हणून हळदी-कुंकवामुळे जनसंपर्क व चांगल्या विचाराची देवाण घेवाण होत असते. त्यामधुनच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते. भगीनीच्या अंगी असलेले अनेक सुप्तगुण चांगला विचार, बोलण्याच्या देवाण घेवाणी निर्माण होतो. म्हणूनच हळदी-कुंकवाला महत्व असते.
सद्या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम लोहा शहरात अनेक ठिकाणी चालू असून त्याचाच भाग म्हणून लोहा येथील मा. नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या निवास्थानी असाच हळदी-कुंकचा कार्यक्रम पार पडला यामध्ये नांदेड जिल्ह्याचे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आर्ध्यांगिणी सौ. प्रतिभाताई चिखलीकर व भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्याक्षा सौ.प्रणिताताई चिखलीकर-देवरे यांनी संबंधित महिलांना हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमा उपस्थित असलेल्या महिलांना मार्गदर्शन केले. यावेळेस मा. नगरसेविका सौ. गोदावरीताई सुर्यवंशी व अनेक महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.