आशाताई बच्छाव
गोंडउमरी येथे वंचित बहुजन महिला आघाडीची सभा
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )गोंडउमरी येथे वंचित बहुजन आघाडीची महिला आघाडीची सभा जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली तर जिल्हा महिला सचिव रेखा रामटेके, तालुका सचिव त्रिवेणी मेश्राम, तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, तालुका संघटक प्रशिक मोटघरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली तालुक्यामध्ये महिलांची कार्यकारीनी निवड करण्यात आली
त्याचप्रमाणे महिलांच्या संघटन वाढवण्या त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू असे मत मान्यवरांनी व्यक्त केले आज आपल्याला आपल्या प्रगती साधण्याकरिता वंचितांचे प्रश्न उचलण्याकरता वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याकरिता वंचित बहुजन आघाडी सोबत जुळणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे बहुजन समाजाने वंचित बहुजन आघाडीला मदत करावी हाथ बळकट करावे असे रेखा रामटेके, जगदीश रंगारी आणि युवा संघटक प्रशिक मोरकर यांनी व्यक्त केले गोंडऊमरी येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली
संचालन त्रिवेणी मेश्राम यांनी केले तर आभार मनीषा ऊके यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रेखा रामटेके, त्रिवेणी मेश्राम ,प्रशिक मोटघरे, किरण बोलके ,राखीव ऊके, मनीषा ऊके ,सविता बोरकर, अनिता ऊके ,निर्मला ऊके, प्रतिमा बागडे ,संगीता रामटेके, दीपा बोरकर ,सविताला लांजेवार, वैशाली ऊके ,द्वारका ऊके, गीता रामटेके, सुखेसिणी उके, वंदना ऊके, ईदू मोटघरे, अलका बोलके इत्यादी महिलांनी मेहनत घेतली