आशाताई बच्छाव
एकोडी (रामटोली) येथील प्रलंबित वनहक्क दावे मंजूर करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) एकोडी रामनगर येथे 40 वर्षा पासून अतिक्रमण करून वास्तव करीत असणारे ग्रामवासी यांनी वन हक्क दावे तहसील कार्यालय , उपविभागीय कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठविण्यात आले. परंतु काही त्रुटी अभावी वनहक्क दावे प्रलंबित आहेत
त्याकरिता वनहक्क दावे प्रकरणात त्रुटी पूर्तता करण्या संबंधाने साकोली तहसील कार्यालयात संबंधित प्रकरणा बाबतीत चौकशी करून त्रुटी पूर्तता करण्यासाठी मंजुरी देण्यात यावी आणि वनहक्क पट्टा मिळण्यात यावा यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना सामाजिक चळवळीचे नेते परमानंद भाऊ मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता मनोजभाऊ कोटांगले, ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, कार्तिक मेश्राम, शैलेश भैसारे, बबलू मेश्राम , सुबोधकांत कोटांगले, उपस्थित होते