आशाताई बच्छाव
भाजपा महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने मा.पंतप्रधान मोदीजींचे अभिनंदन करून धन्यवाद दिले.
नारीशक्ती वंदन अधिनियम ला लोकसभेत मंजुरी मिळाली या निर्णयाचा मोदी सरकारला अभिनंदन करून धन्यवाद दिले .
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):-
नारीशक्ती वंदन अधिनियम ला संसदेत मंजुरी मिळाली असून भविष्यात होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकी मध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार व या आरक्षणाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे.या ऐतिहासिक निर्णयाचा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौक येथे प्रभारी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात फटाके फोडून व पेढे भरवुन मोदी सरकारला तसेच मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा अभिनंदन करून व धन्यवाद देऊन आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी जिल्हा सचिव प्रतिभाताई चौधरी,जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके,शहराध्यक्ष कविताताई उरकुडे,माजी नगरसेविका वैष्णवी नैतान,लताताई लाटकर, रश्मी बाणमारे,पुष्पाताई करकाडे,लक्ष्मीताई कलयंत्री,पल्लवी बारापात्रे,पूनम हेमके,नीताताई बैस,ज्योती बागडे,रंजनाताई शेंडे,रेखाताई उईके,अर्चनाताई निंबोड,महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.