Home गडचिरोली गडचिरोली येथे २३ जून रोजी भाजपाच्या संयुक्त मोर्चाचे संमेलन

गडचिरोली येथे २३ जून रोजी भाजपाच्या संयुक्त मोर्चाचे संमेलन

172
0

आशाताई बच्छाव

IMG-20230620-WA0045.jpg

गडचिरोली येथे २३ जून रोजी भाजपाच्या संयुक्त मोर्चाचे संमेलन

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील संयुक्त मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार

गाणली सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे सकाळी ११ वाजता पासून संमेलन

सर्व आघाडी व मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे आवाहन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नव वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महा जनसंपर्क अभियानांतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व मोर्चा व आघाडीचे संयुक्त संमेलन २३ जून रोजी ११ वाजता गानली सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले असून या संमेलनाला विधानसभा क्षेत्रातील मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.

या संमेलनाला खासदार अशोकजी नेते,जिल्ह्याचे अध्यक्ष किसनजी नागदेवे, आमदार डॉक्टर देवरावजी होळी , संयोजक अनिल पोहनकर यांचे सह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत
या संमेलनाला महिला मोर्चा, किसान मोर्चा, युवा मोर्चा ओबीसी मोर्चा, आदिवासी आघाडी, दलित आघाडी, बंगाली आघाडी विमुक्त भटक्या आघाडी, यांचे सह भाजपाच्या सर्वच मोर्चा व आघाड्याच्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सह जिल्ह्याचे महामंत्री रवींद्रजी ओल्लारवार, प्रमोदजी पिपरे, प्रशांतजी वाघरे, गोविंदजी सारडा, यांनीही केले आहे.

Previous articleखासदार अशोकजी नेते यांच्या मागणीला मान देऊन राष्ट्रपती महामहीम द्रोपदीजी मुर्मू हया दि.०५ जुलै २०२३ ला गडचिरोलीला येणार..
Next articleवर्ग मित्रांचा गेट-टुगेदर कार्यक्रम उत्साहात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here