आशाताई बच्छाव
ह्यूमन सक्सेस सोशल फाउंडेशन(महाराष्ट्र राज्य) कासारवाडी,पुणे येथे रोजी संस्थेच्या वतीने दहावी आणि बारावी परिक्षेमघ्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थीचा सत्कार संपन्न
पुणे :ब्युरो चिफ. उमेश. पाटील
दहावी ,बारावी नंतर पुढे काय? आणि एम पी एस सी,यु पी एस सी करिता मोफत मार्गदर्शन देण्यात आले दहावी आणि बारावी विद्यार्थ्यां करिता युनिक क्लासेस चे डायरेक्टर मा.प्रा.संदीप पवार डॉ.संजय साळवे यांनी तर एम पी एस सी,यु पी एस सी करिता मा. डॉ बबनजी जोगदंड ( यशदा पुणे) व भोसरी पोलिस स्टेशन चे पी एस आय मा.राजू भास्कर यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संजय साळवे होते.प्रथम दीप प्रज्वलन केले व भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे उपाध्यक्ष .विशाल मानकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष . सुखानंद कांबळे यांनी केले. पी.एस.आय राजु भास्कर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना .तुम्ही खुप शिका , मोठे व्हा आणि यशस्वी होऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करा कारण आपल्या आई वडिलांच्या आनंदा मध्येच आपले खरे यश आहे , प्रत्येक विद्यार्थ्याने आपले आवडते क्षेत्र निवडावे जेने करून आपण त्यामुळे पुढे आपण उज्वल भवितव्य घडु असे मनोगत राजु भास्कर यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांना दिला.कार्यक्रमाचे सुत्र संचालन.संदिप साकोरे (मराठी सिनेअभिनेते TDM फेम)यांनी केले
त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते .राहुलजी थोरात, शांतिलालजी ओसवाल विजय गायकवाड,संजित गवारे,ॲड.सुनिल ओहळ,सौ वैशाली कांबळे,.दिनकर पवार,.तौफिक शेख,.संतोष बोडके, अभिनंदन छाजेड़, ममंगेश मुथ्था,.गणेश मुथ्था, .रविंद्र गांधी,विठ्ठल कांबळे . पुष्पदत्त कांबळे,संजय बाराथे,.किरण राजपूत,अभिषेक कांबळे,तसेच पुजा गायकवाड, .विरेशजी छाजेड़, सतिश बांदल आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला