आशाताई बच्छाव
भालेराव खून प्रकरणातील आरोपीला फाशीची
शिक्षा द्या ः रिपब्लिकन सेनेची मागणी
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः राज्यात बौध्द व इतर समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचार ग्रस्तांना न्याय मिळवून देवून गुन्हेगाराविरूध्द कठोर कारवाई करण्यात यावी तसेच नांदेड येथील अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यात बौद्ध व इतर समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत आहेत. तसेच त्यांच्या कोणत्याही मागण्यांचा शासन स्तरावर विचार होत नाही. तसेच त्यांनी अन्याया विरूद्ध अर्ज फाटे केले तरी शासन दरबारी त्याची दखल घेण्यात येत नाही. उलट धनदांडग्या लोकांशी हात मिळवणी करून प्रशासन या लोकांवर जास्तीत जास्त अन्याय करते. त्यांच्या तक्रारी नोंदविण्यास टाळाटाळ करते. त्यामुळे अन्याय करणाऱ्यांचे चांगलेच फोफावत आहे. या अन्यायाचाच भाग म्हणजे नांदेड बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव यांच्या खूनाचे कारण काय तर केवळ बाबासाहेबांची मिरवणूक त्या व्यक्तिने काढली होती. त्यामुळे त्याचा खून करण्यात आला. सदरील प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे. नसता असे लोक आणखीनही काही प्रकार करण्याची शक्यता आहे.
तसेच मुंबई येथील चर्चगेट येथे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह येथे बौद्ध तरूणीचे हत्या प्रकरण घडले आहे. हे आणि असे भयंकर प्रकरणे दलितांशी होत आहेत. परंतु यामध्ये प्रशासन निष्क्रीयतेची भूमिका घेत असल्यामुळे अन्याय करणारे आणखीनच निर्ढावले आहेत. व ते बौद्ध व इतर समाजावर सर्रासपणे अन्याय अत्याचार करीत आहे.