Home पुणे खेड तालुक्यातील शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कुल ची १००% निकालाची परंपरा...

खेड तालुक्यातील शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कुल ची १००% निकालाची परंपरा कायम

168
0

आशाताई बच्छाव

IMG-20230602-WA0053.jpg

खेड तालुक्यातील शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कुल ची १००% निकालाची परंपरा कायम

मुंबई : ( विजय पवार प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील, चोरवणे गाव खेड पासून ५५ किलोमीटर आणि चिपळूण पासुन ४० किलोमीटर आहे.चोरवणे गाव नागेश्वर देवस्थान आणि इतिहासाची पाऊलखुणा दाखवणाऱ्या वासोटा किल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे.अशा या दुर्गम भागात नागेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचालित शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कुल आहे.कित्येक वर्षांपासून या विद्यालयाचा निकाल १००% लागत आहे. यावर्षी शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कुल मध्ये इयत्ता १० वी चे सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत.१००% निकाल लागण्या मागचे एकच कारण आहे येथील मार्गदर्शन करणारे शिक्षक उत्तम प्रकारे मार्गदर्शन करत आहेत आणि विद्यार्थी ही उत्तम प्रकारे अभ्यास करून पास होत आहेत.प्रथम क्रमांक-सोहम विनोद शिंदे 78.80%,द्वितीय क्रमांक-समर्थ विनोद पालांडे 78.20%,तृतीय क्रमांक-तन्वी दिनेश जाधव 77.00%,तृतीय क्रमांक-स्वरांजली संतोष कदम 77.00%.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्थरावरून अभिनंदन होत आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक श्री.गावडे सर, सौ.भुजबळ मॅडम,श्री.भंडारे सर, श्री.ए.जी.उतेकर सर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक देशमाने सर (इंग्रजी),कुमारी ऋतुजा खेर, सौ.खेर मॅडम यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांचे चोरवणे पंचक्रोशी भागातून अभिनंदन होत आहे.

Previous articleलोअर परळ विभागातील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीने दहावी शालांत परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले
Next articleकै. विश्वनाथराव नळगे विद्यालयाचा दहावीचा निकाल ९३.४६ टक्के # मोरे गायत्री ९८ टक्के घेऊन प्रथम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here