आशाताई बच्छाव
नंदुरबार । प्रतिनिधी (सागर )गणेश कांदळकर
शहादा तालुक्यात कृषी विभागाची मोठी कारवाई HTBT बोगस कापूस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले.
गुजरात राज्यातील बडोदा येथून विनापरवाना येणारे ११ लाख किमतीचे ८५७ पाकीट कापूस बियाणे कृषी विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडले. यावेळी ११ लाख किमतीचे बियाणे व वाहन जप्त करण्यात आले आहे. शहादा तालुक्यातील सारंगखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत
दि. 26 मे 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, विनापरवाना कापूस बियाणे खाजगी वाहनाने येत असल्याचे समजले, त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नरेंद्र पाडवी यांनी विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील व शहादा तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे व कृषी अधिकारी योगेश हिवराळे, अभय कौर यांनी सापळा रचून वाहन (क्र. GJ06 PC 3532 ) अडविली व विचारपूस केली असता, वाहनचालक चंद्रकांत पांडुरंग माळी रा. कळंबु ता. शहादा याने विनापरवाना बियाणे गुजरात राज्य येथून आणत असल्याचे कबुल केले. विभागीय कृषी सहसंचालक, नासिक विभाग, नासिक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार तानाजी खर्डे व प्रकाश खरमाळे कृषी विकास अधिकारी जि. प. नंदुरबार, तसेच संजय शेवाळे तंत्र अधिकारी गुण नियंत्रण यांच्या मार्गदर्शन व परवानगीने पुढील कायदेशीर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
सदरील वाहनात एकूण 17 पोते ( 657 पाकिटे) अंदाजीत रक्कम 11 लक्ष 57 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयित आरोपीवर बियाणे कायदा 1966, महाराष्ट्र कापूस बियाणे नियंत्रण कायदा 2009, बियाणे नियंत्रण आदेश 1983 अन्वये शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत सारंगखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.